'ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी

By admin | Published: September 28, 2016 01:12 PM2016-09-28T13:12:47+5:302016-09-28T13:45:11+5:30

पाकिस्तानी कलाकांरांना मनसेने विरोध दर्शवल्यामुळे करण जोहरचा ' ए दिल है मुश्किल' हा आगामी चित्रपट अडचणीत सापडला असून सलमान खाने राज ठाकरेंकडे मध्यस्थी केली आहे.

'A heart is the difficult way to go? Salman Raj Thackeray intervened for doing so | 'ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी

'ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ -  गरजू लोकांच्या मदतीस सदैव तत्पर असणारा बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान यावेळी निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या  मदतीस धावून गेला आहे. पाकिस्तानी कलाकांरांना मनसेने विरोध दर्शवल्यामुळे करण जोहरचा ' ए दिल है मुश्किल' हा आगामी चित्रपट अडचणीत सापडला असून सलमानने करणसोबतचे सर्व जुने मतभेद विसरून मदतीचा हात पुढे करत थेट मनसे प्रमुख राज ठाकरेंनाच फोन लावल्याची माहिती ' सूत्रां'नी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी सलमानेन राज ठाकरेंना फोन केल्याने इथे करणचा जीव मात्र भांड्यात पडला आहे. 
(ऐश्वर्या, शाहरुखचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - मनसे)
(पाकिस्तानी कलाकारांनो, ४८ तासांत भारत सोडा, नाहीतर... - मनसे)
(आमच्यामुळेच पाकिस्तानी कलाकारांची घरवापसी - मनसे)
(मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'?)
उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. '  येत्या ४८ तासांत भारत सोडून पाकिस्तानात परत जा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू' असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला होता. त्यानंतर सर्व बाजूने पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापू लागले होते.
अखेर आठवड्याभरानंतर एकही पाकिस्तानी कलाकार भारतात नसून दिग्दर्शक करण जोहरच्या ' ए दिल है मुश्किल' चित्रपटात प्रमुख भूमिका करणारा फवाद खानही गुपचुपरित्या भारतातून पळ काढल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र असे असले तरी फवाद खानची भूमिका असलेला ' ए दिल है मुश्किल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नुकतीच स्पष्ट केली होती. मात्र मनसेच्या भूमिकेमुळे वैतागलेल्या करण जोहरने 'पाकिस्तानी कलाकारांना विरोध करून दहशतवादी हल्ले रोखले जाऊ शकत नाहीत' अशी टिपण्णी करत ' दरवेळी आपल्याला सॉफ्ट टार्गेट' केलं जात असा आरोप केला होता. त्यानंतर खवळलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी काल करण जोहरच्या ऑफीसबाहेर निदर्शने केली होती. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या करण जोहरला ' नक्की काय करायचं' हे सुचेना , तेव्हा सलमानने जुने मतभेद विसरून त्याच्या मदतीसाठी धाव घेतली.
 
जुने मतभेद विसरत सलमानने निभावली मैत्री..!
एकेकाळी चांगले मित्र असलेल्या करण -सलमानदरम्यान मध्यंतरीच्या काळात दुरावा निर्माण झाला होता. ' एआयबी रोस्ट' कार्यक्रमात करण सहभागी झाल्यामुळे सलमान नाराज झाला होता. त्या कार्यक्रमात सलमानची बहीण अर्पिता हिच्यावरही निशाणा साधण्यात आल्याने सलमान भलताच संतापल होता. त्यानंतर त्याने करणच्या ' शुद्धी' चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने हा दुरावा आणखीनच वाढला. 
मात्र आता करणचा चित्रपट अडचणीत सापडल्यानंतर सलमान त्याच्या मदतीस धावून गेल्याने इंडस्ट्रीत आनंद व आश्चर्य व्यक्त होत आहे. 
 
पाकिस्तानी कलाकारांविरोधात तलवार म्यान केल्यास राज ठाकरेंना बसणार फटका?
दरम्यान पुढच्या वर्षी महापालिका निवडणूका होणार आहेत. त्या दृष्टीने राज ठाकरे यांनी आत्ता पाकिस्तानी कलाकारांविरोधात घेतलेली भूमिका मागे घेतल्यास निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज ठाकरे आता मैत्री की राजकारण या पेचात अडकले असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 'A heart is the difficult way to go? Salman Raj Thackeray intervened for doing so

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.