'ए दिल...'ची 4 दिवसांत 121 कोटींची विक्रमी कमाई
By Admin | Published: November 1, 2016 04:48 PM2016-11-01T16:48:43+5:302016-11-01T16:51:39+5:30
दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'ने बॉक्सऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - दिग्दर्शक निर्माता करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'ने बॉक्सऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. चार दिवसांत सिनेमाने तब्बल 121 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. दिवाळीनंतर हा सिनेमा आणखी कमाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चित्रपट समिक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी 'ए दिल है...'ने केलेल्या कमाईसंदर्भातील माहिती ट्विट करुन दिली आहे.
रिलीजच्या दुस-या दिवशी सिनेमाने जवळपास 13.10 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दोन दिवसांची मिळून 26.40 कोटी रपये इतका गल्ला या सिनेमाने बॉक्सऑफिसवर जमवला होता. तर आता चार दिवसांत सिनेमाने तब्बल 121 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
रिलीजपूर्वीच हा सिनेमा ब-याच चर्चेत होता. पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा सहभाग असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिनेमाला विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही अटी घालत सिनेमाला केलेला विरोध मागे घेतला.
#ADHM continues its VICTORY MARCH in the international arena... Total till Mon: $ 6.55 million [₹ 43.72 cr].
— taran adarsh (@taran_adarsh) November 1, 2016
#ADHM is TERRIFIC... Mon HIGHER than Fri, Sat, Sun... Fri 13.30 cr, Sat 13.10 cr, Sun 9.20 cr, Mon 17.75 cr. Total: ₹ 53.35 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) November 1, 2016
'मनसे'ने सिनेमा प्रोड्युसर्स असोसिएशनला घातलेल्या अटी
'भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक, तंत्रज्ञ यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लिहून द्या, अशी अट दिग्दर्शक- निर्मात्यांपुढे ठेवली व त्यांनी ती मान्य केली', असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. तसेच 'जे निर्माते पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमे बनवत आहेत त्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये आर्मी वेलफेअर फंडासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे जमा करावेत', अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. शिवाय 'ए दिल है मुश्किल' सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणारी पाटी दाखवावी, अशी अटदेखील मनसेने घातली होती.