दिवसा उष्मा; रात्री गारवा

By admin | Published: March 8, 2017 05:13 AM2017-03-08T05:13:17+5:302017-03-08T05:13:17+5:30

गेल्या काही दिवसांच्या उष्णतेनंतर मध्यमहाराष्ट्रातील विविध ठिकाणी किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली असून, कमाल तापमानाचा पारा पस्तीशीवर आहे.

Heat during the day; Nightfall | दिवसा उष्मा; रात्री गारवा

दिवसा उष्मा; रात्री गारवा

Next

पुणे : गेल्या काही दिवसांच्या उष्णतेनंतर मध्यमहाराष्ट्रातील विविध ठिकाणी किमान तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली असून, कमाल तापमानाचा पारा पस्तीशीवर आहे. त्यामुळे दिवसा गरमी तर रात्री गारवा असे चित्र दिसून येत आहे. कोकण किनारपट्टीतील भिरा येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेले काही दिवस राज्यातील उष्मा कमालीचा वाढला होता. किमान आणि कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत होती. मंगळवारी कोकण, मध्यमहाराष्ट्रातील किमान तापमानात कमालीची घट झाली असून, विदर्भातील काही ठिकाणच्या तापमानात किंचित घट झाली आहे. कोकण किनारपट्टी भागाती भिरा पुन्हा एकदा राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे. येथील कमाल तापमानाचा पारा ३८.५, तर किमान तापमानाचा पारा १९.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. राज्यात पुणे आणि सातारा सर्वात थंड शहर ठरले आहे. येथी तापमानाचा किमान पारा १२ अंशावर होता. मात्र पुण्याचा कमाल पारा ३५ आणि साताऱ्याचा ३५.१ अंश सेल्सिअस होता. पुण्यातील लोहगावातील कमाल तापमान ३५.५ व पाषाण येथील ३६.१ अंश सेल्सिअस होते.
नाशिकमधील कमाल तापमान ३२.८, सांगली ३६.३ अंश सेल्सिअस असून, किमान पारा अनुक्रमे १४.३ व १६.८ इतका आहे. सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस असून, किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस आहे. विदर्भात अकोल्याचे कमाल तापमान ३५.७ आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. परभणीचे कमाल तापमान ३५.६ व किमान तापमान १९.१, तर चंद्रपूरचे कमाल तापमान ३५.२ व किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नागपूरचे कमाल तापमान ३३.५, वाशिम ३२.४, बुलडाणा ३२.७, अमरावती ३३.८, वर्धा ३३.९ आणि यवतमाळचे तापमान ३३ अंश सेल्सिअस होते.

जळगावात कमाल तापमान ३४.५ व किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस होते. कोल्हापूरचा कमाल तापमानाचा पारा ३५.२, तर किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस आणि मालेगावचे कमाल तापमान ३६.२ व किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. महाबळेश्वर येथील कमाल तापमानाचा पारा ३१.१ व किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअसवर होता.

Web Title: Heat during the day; Nightfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.