उष्णतेची लाट कायम
By Admin | Published: May 23, 2016 05:06 AM2016-05-23T05:06:18+5:302016-05-23T05:06:18+5:30
विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़
पुणे : विदर्भासह पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश व अन्य भागात उष्णतेची लाट कायम आहे़ रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़ राज्यात नागपूर येथे सर्वाधिक ४५़४ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी तसेच दक्षिण व ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण तसेच विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.प्रमुख शहरातील कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
नागपूर ४५़४, चंद्रपूर, वर्धा ४५, बह्मपुरी ४४़७, परभणी ४३़४, जळगाव ४३, अकोला व नांदेड ४२़५, यवतमाळ ४२़५, गोंदिया व मालेगाव ४२़४, अमरावती ४२, सोलापूर ४१़४, बुलढाणा ४०़७, औरंगाबाद ४०़४, अलिबाग ३७़८, सांगली ३७़३, पुणे ३६़७, सातारा ३६़६, नाशिक ३६़४, डहाणू ३६़१, मुंबई ३५़५, पणजी ३५़३, कोल्हापूर ३५़२, रत्नागिरी ३४़२ आणि महाबळेश्वर ३०़२.रविवारी देशात पश्चिम राजस्थानमधील गंगानगर आणि चुरु येथे सर्वाधिक ४९़२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली़नैऋत्य मोसमी पावसाची आग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान समुद्र व अंदमान द्वीपसमूहाच्या उर्वरित भागात वाटचाल स्थिर आहे़ मॉन्सून पुढे सरकरण्याच्या दृष्टीने कोणतीही प्रगती झालेली नाही़