राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट
By admin | Published: April 17, 2017 03:03 AM2017-04-17T03:03:57+5:302017-04-17T03:03:57+5:30
कोकण वगळता राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे़ मार्च महिन्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे देशभरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत
पुणे : कोकण वगळता राज्यभरात उष्णतेची लाट आली आहे़ मार्च महिन्यात पडणाऱ्या मान्सूनपूर्व पावसामुळे देशभरात उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळत असे़ पण, यंदा मान्सूनपूर्व पावसात ११ टक्के घट झाल्याने देशभरातच उष्णतेत वाढ झाली आहे़
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे ४५़९ आणि चंद्रपूर येथे ४५़८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १९़९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़
देशभरात १ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान सरासरी ४९़२ मिमी पावसाची नोंद होते़ यंदा मात्र केवळ ४४़३ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ ११ टक्के पाऊस कमी झाला आहे़ यावर्षी १२ एप्रिलपर्यंत कोकणात सरासरी ०़६ मिमी पावसाची नोंद होत असते़ यंदा अजिबात पाऊस झाला नाही़ मध्य महाराष्ट्रात ५़५ मिमी पाऊस होतो़ यंदा १़२ मिमी पावसाची नोंद झाली़ सरासरीपेक्षा ७९ टक्के कमी पाऊस झाला़ मराठवाड्यात ८़४ मिमी सरासरीच्या तुलनेत ४़७ मिमी पाऊस झाला असून तो ४३ टक्के कमी आहे़ विदर्भात १५़४ मिमीच्या तुलनेत केवळ ६़१ मिमी पाऊस झाला असून तो ६० टक्के कमी आहे़
मान्सूनपूर्व पावसाचा अभाव तसेच आकाशात ढगांचा अभाव असल्याने सूर्याची प्रखरता वाढलेली आहे़ त्यात वाळवंटी प्रदेशातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांची तीव्रताही खूप वाढल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व अन्य ठिकाणच्या कमाल तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे़ पश्चिम राजस्थानमधील बऱ्याच ठिकाणी तसेच पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पूर्व राजस्थान येथेही उष्णतेची लाट आली आहे़ हरियाणा, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ येथील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे़ (प्रतिनिधी)
पुणे ४०़७, अहमदनगर ४३़२, जळगाव ४४़५, कोल्हापूर ३६़४़, महाबळेश्वर ३३़९, मालेगाव ४२़६, नाशिक ४०़, सांगली ४०़, सातारा ४०़९, सोलापूर ४३़१, मुंबई ३४़२, अलिबाग ३३़९, रत्नागिरी ३२़४, पणजी ३४, डहाणु ३५, औरंगाबाद ४१़४, परभणी ४४़२, नांदेड ४४़५, बीड ४३़२, अकोला ४५, अमरावती ४३़८, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४५़९, चंद्रपूर ४५़८, गोंदिया ४४़२, नागपूर ४५, वर्धा ४५, यवतमाळ ४३़५ (अंश सेल्सिअस)