विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाळीव पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:45 AM2022-05-04T05:45:16+5:302022-05-04T05:49:57+5:30
हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : वैशाख वणव्याच्या ताप कायम असून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस, उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गडगडाटासह वळीव पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहे.
- ४ मे : कोकण, मराठवाडा, पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर उत्तर मध्य तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
- ५ मे : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
- तापमान व आर्द्रता यांचा होणारा परिणाम अधिक घातक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
तापलेली शहरे
अकोला ४४.२ । अमरावती ४३.६
बुलढाणा ४१.४ । ब्रह्मपुरी ४४.२
चंद्रपूर ४४.४ । गडचिरोली ४१.४
गोंदिया ४३.५ । नागपूर ४३.५
वर्धा ४४.५ । वाशिम ४२.५
यवतमाळ ४३.५ । पुणे ३७.८
मालेगाव ४४ । परभणी ४३.८
सातारा ३८.६ । सोलापूर ४२
मुंबई ३४.७ । औरंगाबाद ४०.२