राज्यात उष्णतेची लाट
By Admin | Published: March 31, 2017 04:36 AM2017-03-31T04:36:36+5:302017-03-31T04:36:36+5:30
मध्य महाराष्ट्र व विदर्भात आलेली उष्णतेची लाट एक दिवस कायम राहणार आहे़ शुक्रवारी विदर्भात काही ठिकाणी तसेच
मुंबई : मध्य महाराष्ट्र व विदर्भात आलेली उष्णतेची लाट एक दिवस कायम राहणार आहे़ शुक्रवारी विदर्भात काही ठिकाणी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ तर आर्द्रतेमध्ये नोंदवण्यात येणाऱ्या चढ-उतारासह ढगाळ हवामानामुळे मुंबईतला उकाडा कायम आहे. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत असून, घामाच्या धारा वाहत आहेत.
राज्यात सर्वांत जास्त तापमान अकोला येथे ४४ अंश सेल्सिअस तर, सर्वांत कमी महाबळेश्वर येथे २०़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ १ एप्रिलला मराठवाड्यात तसेच २ एप्रिलला मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्र तसेच कोकण किनारपट्टीचे तापमान सरासरी २ ते ६ अंशाने वाढले आहे. (प्रतिनिधी)
प्रमुख शहरांतील तापमान
अकोला ४४, पुणे ३९़७, अहमदनगर ४१़८, जळगाव ४२़़२, कोल्हापूर ३६़१़, महाबळेश्वर ३२़६़, मालेगाव ४२, नाशिक ३९़९, सांगली ३७़७, नागपूर ४३़३, सातारा ३८़३, सोलापूर ४०़७,
मुंबई ३३़२, अलिबाग ३४़१, भिरा ४०.५, रत्नागिरी ३२़२, पणजी ३३़५, डहाणू ३३़७, उस्मानाबाद ३८़७, औरंगाबाद ४१़१, परभणी ४२़३, नांदेड ४२़५, अमरावती ४३़, बुलढाणा ४०़, चंद्रपूर ४३़२,
गोंदिया ४०़६, वर्धा ४३़६, वाशिम ३९़६, यवतमाळ ४२़५़
(कमाल तापमान - अंश सेल्सिअस)