विदर्भात उष्णतेची लाट :
By admin | Published: May 15, 2016 02:23 AM2016-05-15T02:23:08+5:302016-05-15T02:23:08+5:30
हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
चंद्रपूर ४६
नागपूर ४५.६ अंश
नागपूर : हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात शनिवारी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर प्रदेशातील बांदा येथील ४७ अंश सेल्सिअस तापमानाखालोखाल विदर्भ तापलेला आहे.
चंद्रपूर सर्वांत ‘हॉट’ राहिले असून येथील तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. यापाठोपाठ ब्रह्मपुरी येथेही ४६ अंश आणि नागपूर उपराजधानीत ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या उन्हाळ्यातील तापमानाचा हा उच्चांक आहे. यापूर्वी मागील महिन्यात चंद्रपूर येथील तापमान ४५.६ अंशावर गेले होते. शुक्रवारी चंद्रपूर येथील तापमान केवळ ४४ अंश सेल्सिअस होते. परंतु शनिवारी एकाच दिवसात २ अंश सेल्सिअसने ते वर चढले. हवामान खात्याने यापूर्वीच मे महिन्यातील तापमान ४७ अंशापर्यंत पोहोचण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रपुरात शनिवारी सकाळी ७ वाजतापासून उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले. दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वेगाने वाढ झाली. मे महिन्याचा दुसरा आठवडा चंद्रपूरकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
अमरावतीकरांना ४५.२ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
वर्धेचे तापमान ४५.५ अंशावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. यंदाही एप्रिलमध्ये ४५ अंशावर पोहोचणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता.अवकाळी पावसामुळे पारा ३६ पर्यंत खाली आला होता.
यवतमाळात ४४ अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. गोंदियात तापमान शनिवारी ४४.८ अंशावर पोहोचले. भंडाऱ्यात ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारला तापमान वाढून ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर @ ४६
दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वेगाने वाढ झाली. मे महिन्याचा दुसरा आठवडा चंद्रपूरकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
अमरावतीकरांना ४५.२ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
वर्धेचे तापमान ४५.५ अंशावर पोहोचल्याची नोंद करण्यात आली. यंदाही एप्रिलमध्ये ४५ अंशावर पोहोचणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला होता.अवकाळी पावसामुळे पारा ३६ पर्यंत खाली आला होता.
यवतमाळात ४४ अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले. यापूर्वी एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कमाल तापमान ४३.६ अंशांपर्यंत गेले होते. त्यानंतर अवकाळी पावसामुळे पारा ४० अंशाखाली घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु शनिवारी पुन्हा ४४ अंश इतके कमाल, तर २७.२ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.
गोंदियात एरवी जास्तीत जास्त ४२ ते ४३ अंशापर्यंत राहणारे तापमान शनिवारी चक्क ४४.८ अंशावर पोहोचले. त्यामुळे उन्हाच्या तीव्र चटक्यांनी गोंदियावासी होरपळून निघाले. भंडाऱ्यात ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. शुक्रवारला तापमान अचानक वाढून ४१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विदर्भातील तापमान अंश सेल्सि.
शहर कमाल किमान
नागपूर४५.६२६.५
अकोला४४.२३०.७
अमरावती ४३.२२७.२
बुलडाणा ४१.३२९
ब्रम्हपुरी ४६३१.४
चंद्रपूर ४६३१.८
गोंदिया ४४.८२९.६
वर्धा ४५.५ २९.५
यवतमाळ ४४२७