मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 06:03 IST2025-03-08T06:03:52+5:302025-03-08T06:03:52+5:30
Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो.

मुंबई, ठाण्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा; १२ मार्चपर्यंत तापमानात वाढ, पारा गाठणार चाळिशी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात ९, १० आणि ११ मार्च रोजी उष्णतेची लाट येईल, अशी माहिती माजी हवामान अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा, तर दक्षिण कोकणातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येतील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईचे कमाल तापमान शुक्रवारी ३५.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, बुधवारपर्यंत यात आणखी वाढ होणार आहे.
पारा गाठणार चाळिशी...
हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले, की पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे. १२ मार्चपर्यंत मुंबई महानगर प्रदेशात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो.
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
उष्णतेची लाट म्हणजे?
कोकणात उष्णतेची लाट म्हणजे दिवसाचे कमाल तापमान ३७ अंशांपेक्षा अधिक नोंदविले जाईल. ते त्या दिवसाच्या सरासरी तापमानापेक्षा ४ अंशांनी जास्त असेल.