उष्णतेच्या लाटेने पुन्हा होरपळ; ब्रह्मपुरीत पारा ४५.९ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:49 AM2019-05-21T05:49:46+5:302019-05-21T05:49:50+5:30
पश्चिम महाराष्ट्रही तापला; सरासरी तापमान ४० अंशांपुढे
पुणे : उष्णतेच्या लाटेने पुन्हा एकदा महाराष्ट्र होरपळला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्रालाही सर्वाधिक झळ बसली आहे. राज्यात सर्वाधिक तापमान ब्रम्हपुरी येथे ४५़९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. येत्या शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
दक्षिण अंदमान समुद्रात आलेला मान्सून अद्याप तेथेच स्थिरावला असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकुल वातावरण असतानाच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे़ मराठवाड्यातही कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे़ विदर्भात ४२ ते ४५ अंश सेल्सिअस असे सर्वाधिक तापमान आहे.
मंबईतील तापमान ३४ अंशावर असले तरी झटका ४० अंशाचा बसत होता. उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले होते.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान
पुणे ४१़३, लोहगाव ४१़७, महाबळेश्वर ३५़६, मालेगाव ४३़८, नाशिक ४०़३, सातारा ४०़९, सोलापूर ४४़३, मुंंबई ३४, सांताक्रुझ ३४़८, रत्नागिरी ३३़७, पणजी ३४़२, डहाणू ३५़१, औरंगाबाद ४१़६, अकोला ४४़६, अमरावती ४३, बुलढाणा ४२, ब्रम्हपुरी ४५़९, चंद्रपूर ४५़८, गोंदिया ४३़८, नागपूर ४४़२, वर्धा ४५़५, यवतमाळ ४३़
मध्य महाराष्ट्राची होरपळ
च्मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट असेल.
च्सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात २१ ते २४ मे दरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़