Heavy Rain Alert In Maharashtra: मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत शाळा-कॉलेज बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 09:52 PM2022-07-13T21:52:20+5:302022-07-13T21:52:29+5:30
Heavy Rain Alert In Maharashtra: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती आणि ठाणे येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy Rain Alert In Maharashtra: भारतीय हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती आणि ठाण्यात उद्या पावसाच्या संदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, नाशिक आणि पुणे येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालये 16 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील अत्यावश्यक कामे करणारी शासकीय कार्यालये वगळता सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर आस्थापने 16 जुलैपर्यंत बंद राहतील. रेड अलर्ट (अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा) पाहता प्रशासनाने 10 ते 13 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बुधवारी या आदेशाला 16 जुलैपर्यंत वाढ दिली.
Nagpur, Maharashtra | 10 people died in last 24 hours. IMD forecast more torrential rains next 3 days. 20 died, 19 injured in various incidents from June 1 to July 13 due to the rains. 88 animals were also killed & 293 houses were damaged: Dist Administration
— ANI (@ANI) July 13, 2022
अतिवृष्टीच्या अंदाजामुळे पुणे शहरातील तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा गुरुवारी बंद राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.