नंदुरबारसह जिल्ह्यात दमदार पाऊस

By Admin | Published: July 4, 2016 07:18 PM2016-07-04T19:18:33+5:302016-07-04T19:18:33+5:30

यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच दमदार पाऊस सोमवारी झाला. जिल्ह्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आ

Heavy rain in the district along with Nandurbar | नंदुरबारसह जिल्ह्यात दमदार पाऊस

नंदुरबारसह जिल्ह्यात दमदार पाऊस

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. ४ : यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच दमदार पाऊस सोमवारी झाला. जिल्ह्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसात पेरण्यांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. रविवारी जिल्हाभरात पाऊस झाला असला तरी तो तुरळक स्वरूपाचा होता. त्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा कायम होती. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान नंदुरबारसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. साधारणत: अर्धा ते पाऊणतास पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अनेक भागातील नदी, नाले प्रवाही झाल्याचे चित्र आहे. यामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा आणि भुगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Heavy rain in the district along with Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.