कोकणला मुसळधार पावसाचा इशारा
By admin | Published: September 12, 2015 01:25 AM2015-09-12T01:25:11+5:302015-09-12T01:25:11+5:30
दक्षिणेसह उत्तरेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी दिला आहे.
मुंबई : दक्षिणेसह उत्तरेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील ७२ तासांत गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी दिला आहे.
तत्पूर्वी मुंबईत गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा विश्रांती घेतली असून, शहराचे कमाल तापमान ३२ अंशावर पोहोचले आहे.
राजस्थानच्या आणखी काही भागातून व पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा शुक्रवारी कायम आहे, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. मागील चोवीस तासांत गोव्यासह कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. (प्रतिनिधी)
१२, १३, १४ आणि १५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
१२ ते १५ सप्टेंबरदरम्यान गोव्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडेल.
मुंबईत ४८ तासांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.