जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 12:35 PM2017-08-29T12:35:14+5:302017-08-29T20:21:05+5:30

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे.

Heavy rain! Kundalika and Amba rivers in Raigad crossed the danger level | जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

googlenewsNext

जयंत धुळप/रायगड, दि. 29 - गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व गावांमध्ये संबधीत धोक्याचा इशारा देऊन ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले आहे. शिवाय, आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

सावित्री नदी किनारवरील 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारा
दरम्यान महाबळेश्वर येथे सोमवारी (28 ऑगस्ट) रात्री झालेला पाऊस आणि पोलादपूर व महाड तालुक्यांत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे यामुळे सावित्री नदीच्या जलपातळीतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सावित्री नदी किनारच्या 43 गावांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाटबंधारे विभागाचा जिल्हा प्रशासनास तातडीचा संदेश
कुंडलिका नदीची धोक्याची पातळी २३.९५ मीटर आहे व सद्यस्थितीत जलपातळी डोलवहाळ येथे २३.४० मीटर झाली तर अंबा नदीची धोक्याची जलपातळी नागोठणे येथे ९ मीटर आहे तर सद्यस्थितीत ही पातळी ८.२० मीटर झाली आहे. कोणत्याही क्षणी या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी किनारच्या गावांमध्ये घुसू शकत असल्याने,  किनारवरील गावे, वस्त्या व वाड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, असा संदेश रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातील पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे रायगड जिल्हा प्रशासनास पाठवून कळवले आहे.

समुद्र भरतीमुळे नदी जलपातळी खाली येण्यास किमान 4 तास लागणार
सकाळी 11 वाजता समुद्राला पूर्ण भरती असल्याने तसेच पाऊस सतत सुरु असल्याने नद्यांचे पाणी समुद्रात पोहोचून पूर पातळी खाली येण्यास किमान चार तास लागणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

पेणमध्ये 24 तासांत २६० मिमी विक्रमी पाऊस
जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच असून 24 तासांत जिल्ह्यात सर्वाधिक आणि विक्रमी अशा २६० मिमी पावसाची नोंद पेण येथे तर २१३ मिमी पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी अलिबाग येथे १५५, मुरुड-१२७, पनवेल-१२४, उरण-१७१,  माणगांव-१०७, तळा-१५५, महाड-११३.५०, पोलादपूर-१२३, श्रीवर्धन-१००,माथेरान-१३८ ,कर्जत-७५.८०, खालापूर-७८,  रोहा-१४२, पाली-सुधागड-८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचे  सरासरी पर्जन्यमान या 24 तासात १३५.४२ मिमी होते.

भिरा धरण क्षेत्रात 183 मिमी पाऊस
रायगड जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 183 मिमी पावसाची नोंद झाली असून, धरणातील जलपातळी नियंत्रणात राखण्याकरीता धरणाच्या तीन दरवाजांपैकी क्र.1 व 3 असे दोन दरवाजे 0.25 सेमी उघडण्यात आले आहेत. परिणामी आता पर्यंत 62.400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. भिरा धरण क्षेत्रांत 1 जून 2017 पासून एकूण 4454.20 मिमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी धरणातील जलपातळी 95.12 झाली आहे. 
 

Web Title: Heavy rain! Kundalika and Amba rivers in Raigad crossed the danger level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.