मुंबईत मुसळधार, कोविड स्पेशल जेजे रुग्णालयात घुसलं पाणी; आदित्य ठाकरेंचं घरातच थांबण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:00 PM2020-08-05T21:00:18+5:302020-08-05T21:07:58+5:30
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तसेच दक्षिणी मुंबईतील कुलाबा भागात तब्बल 107 किमी प्रति तास वेगाने हवा सुरू होती.
मुंबई -मुंबईसह उपनगरात सलग दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकानची झाडेही तुटली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना ट्रॅफिक जॅमच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बुधवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता. तसेच दक्षिणी मुंबईतील कुलाबा भागात तब्बल 107 किमी प्रति तास वेगाने हवा सुरू होती.
मुंबईतील जेजे रुग्णालयातही पाणी घुसले आहे. जेजे रुग्णालय हे कोविड-19 (Covid-19)च्या उपचारासाठी बीएमसीने निश्चित केलेल्या रुग्णालयांतील एक महत्वाचे रुग्णालय आहे. रुग्णालयातील कर्मचारी बकेट आणि इतर साहित्याच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रुग्णालयातील काही लोक हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई शहरालाच बसला आहे.
JJ Hospital flooded. Fight against Coronavirus gone down the drain.#MumbaiRains#PrayforMumbaipic.twitter.com/keEUhatIdU
— Team Ruthless 😷😷 (@Ruthlessindia) August 5, 2020
यातच महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकांना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. आदित्य यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'मी सर्वांना घरातच थांबण्याचे आवाहन करतो. मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याचे आपण पाहतच आहोत. मी आपना सर्वांना, विशेषत: जे पत्रकार हे कव्हर करत आहेत त्यांना सुरक्षित रहण्याचे आवाहन करतो. आपण जेथे असाल तेथेच थांबा.'
Requesting all to remain indoors. Mumbai is lashed with high velocity winds and extremely heavy rain as we all can witness. I request all, especially journalists trying to cover this to remain safe. Stay put wherever you are
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2020
पाऊस सुरूच राहणार -
मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस सुरूच आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे, की सध्या मुंबईत 70 किलो मीटर प्रति तास वेगाने सुरू असलेले वारे पुढील तीन ते चार तास सुरूच राहील. तसेच पुढील तीन तासांत शहरात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या -
मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"
Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...