पुढचे तीन दिवस धुव्वाधार पावसाचे !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 07:49 PM2018-07-16T19:49:29+5:302018-07-16T19:55:09+5:30

पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिण गुजरात परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे संपूर्ण उत्तर व मध्य भारतात पाऊस होत असून त्याचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे़.

Heavy Rain for the next three days ! | पुढचे तीन दिवस धुव्वाधार पावसाचे !

पुढचे तीन दिवस धुव्वाधार पावसाचे !

Next
ठळक मुद्देकोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीराज्यात सर्वत्र पाऊस होणार 

पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिण गुजरात परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे संपूर्ण उत्तर व मध्य भारतात पाऊस होत असून त्याचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून विदर्भात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बºयाच ठिकाणी पाऊस पडला़ पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ 

        सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यातील जव्हार १९०, अंबरनाथ, बेलापूर (ठाणे), मुरबाड, वाडा १७०, कल्याण, शहापूर, विक्रमगड १५०, पोलादपूर १३०, पनवेल, पेण १२०, भिवंडी, मंडणगड, ठाणे ११०, पालघर १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ याशिवाय बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात हरसूल १७०, ओझरखेडा १५०, जावळी माथा, राधानगरी १३०, पेठ १२०, चंदगड ११०, पौड मुळशी १००, त्र्यंबकेश्वर ९०, आजरा, गारगोटी, पाटण, शाहूवाडी, सुरगणा, वडगाव मावळ ७०, आंबेगाव, घोडेगांव, गगनबावडा, साक्री ६० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यात माहूर ३०, किनवट, उमरी २०, औसा, धारुर, हिमायतनगर, जिंतूर, कळमनुरी, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात गोरेगाव १३०, भामरागड, धनोरा, मूल, चेरा, शिंदेवाही, तिरोरा १००, आमगाव, एटापल्ली, गोंदिया, तुमसर ९०, चामोर्शी, गौड पिंपरी ७०, आरमोरी ६०, अहिरी, बल्लारपूर, चंद्रपूर, मोहाडी, पोम्भूर्णा, सडक अर्जुनी, साली ५० मिमी पावसाची नोंद झाली़ याशिवाय अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ मॉन्सून सध्या मध्य महाराष्ट्र आणि केरळमध्ये जोरदार असून ओडिशा, हिमाचल प्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेशची किनारपट्टी कर्नाटकाचा अंतर्गत भागात सक्रीय आहे़.  

 

पुण्यातून वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ  डॉ़ ए़ के़ श्रीवास्तव यांनी वर्तवलेला अंदाज पुढीलप्रमाणे  :

  • कोकण, गोवा, गुजरात, सौराष्ट्र, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विविदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडु, केरळ या भागातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ 
  • १७ ते २०जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तसेच जोरदार पाऊस होण्याची शक्यता़ 
  • १७ जुलै रोजी विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़.
  • १८ जुलै रोजी  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़
  • २० जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचीचांगला पाऊस होण्याची शक्यता आहे़  राज्यात नंदूरबार जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये आता सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़. 

Web Title: Heavy Rain for the next three days !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.