पुणे, कोल्हापुरात जोरदार पाऊस
By admin | Published: October 11, 2016 05:32 AM2016-10-11T05:32:27+5:302016-10-11T05:32:27+5:30
गालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोवा, आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुणे
पुणे : बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गोवा, आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूरसह काही भागांत सोमवारी जोरदार पाऊस झाला. येत्या २४ तासांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
नैर्ऋत्य मोसमी पाऊस उत्तर भारताच्या आणखी भाग आणि मध्य व पश्चिम भारताच्या काही भागातून माघारी परतण्यासाठी अनुकूल स्थिती आहे़ साधारणपणे १५ आॅक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण उत्तर भारत, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा येथून माघारी परततो़ यंदा आतापर्यंत तो राजस्थान, उत्तर भारताचा काही भाग, मध्य भारतातील काही भागातून माघारी आला आहे़ त्यामुळे पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे़
पुण्यात सायंकाळी पाऊण तास जोरदार पाऊस झाला असून, पुणे वेधशाळेकडे २७ मिमी पावसाची नोंद झाली.कोल्हापूर शहरातही सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
गेल्या २४ तासांत कोकणातील रत्नागिरी, सावंतवाडी ८०, राजापूर, ७० मिमी पावसाची नोंद झाली़ मध्य महाराष्ट्रातील राधानगरी ७०, कराड ४०, आजरा, गगनबावडा, गारगोटी, खंडाळा बावडा, पुणे (लोहगाव), शिरूर, घोडनदी २० मिमी पाऊस झाला़ मराठवाड्यातील भूम येथे १० मिमी पाऊस झाला़ (प्रतिनिधी)