मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

By admin | Published: July 28, 2014 11:23 AM2014-07-28T11:23:59+5:302014-07-28T11:24:08+5:30

मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानेही मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे.

Heavy rain in the state including Mumbai | मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

मुंबईसह राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

Next

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - मुंबईसह ठाणे, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा विविध भागात सोमवारी पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्यानेही मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. 
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोकल गाड्याही काहीशा विलंबानेच धावत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. तर विदर्भात मुसळधार पावसामुळे अप्परवर्धा धरणाचे दरवाजे उघडावे लागले.  
डहाणू - पालघर भागात पावसामुळे २५ गावांशी संपर्क तुटला आहे. पालघरमधील सुर्या नदीवरील मासवण पुल पाण्याखाली गेल्याने २५ गावांशी संपर्क तुटला आहे. मरोठ मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली आहे.
 

Web Title: Heavy rain in the state including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.