मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 08:17 PM2019-09-26T20:17:38+5:302019-09-26T20:20:27+5:30
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा..
पुणे : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ येत्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सर्वदूर ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
मॉन्सून सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, तामिळनाडु, कर्नाटक, केरळ, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी सक्रिय आहे़. कोकणात सुधागड पाली ९०, डहाणु ५०, पेण, संगमेश्वर, देवरुख ४०, जव्हार, खेड, माणगाव, मुरुड, पोलादपूर, वैंगुर्ला ३० मिमी पाऊस पडला़ मध्य महाराष्ट्रात संगमेश्वर २८०, पुरंदर सासवड १४०, रहाता १००, दिंडोरी, शिरपूर, श्रीरामपूर, सुरगाणा ७०, मुक्ताईनगर, वेल्हे ६०, बोदवड, पेठ, पुणे, येवला ५०, दहीगाव, जामनरे, जावळी मेधा, ओझर, पाटण, पौड, सांगोला, सिंदखेडा, सिन्नर, सोलापूर ४० मिमी पावसाची नोंद झाली होती़ त्याशिवाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडला़.
मराठवाड्यातील बिलोली ५०, कळंब ४०, औरंगाबाद, बदनापूर, भोकरदन, मुदखेड, परांदा, सेनगाव, सिल्लोड, वडवणी ३०, घनसावंगी, कन्नड, खुलताबाद, परळी वैजनाथ, फुलंब्री, पूर्णा, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़.
विदर्भात आमगाव, अमरावती, भिवापूर, मंगळुरपीर, नागपूर ५०, बुलढाणा, खामगाव, रिसोड, संग्रामपूर ४० मिमी पाऊस झाला याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला़.
येत्या २४ तासात कोकण, गोव्यत बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .
़़़़़़़़़़़
पालघर येथे शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. कोकणातील अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ .