‘रिपरिप’कडून पाऊस ‘धो-धो’कडे; विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 07:21 AM2023-08-20T07:21:21+5:302023-08-20T07:21:34+5:30

अनेक दिवस रजेवर गेलेल्या पावसाने अचानक हजेरी लावली.

Heavy rainfall expected as Yellow alert for most districts in Vidarbha | ‘रिपरिप’कडून पाऊस ‘धो-धो’कडे; विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

‘रिपरिप’कडून पाऊस ‘धो-धो’कडे; विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नागपूर: मुंबईसह विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी पाऊस झाला असून, रविवारीही मान्सून विदर्भ, मराठवाड्यात सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, कोकणातही पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, २० ऑगस्टला मध्य प्रदेश आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्येही पावसाची शक्यता आहे. २१ ऑगस्टपासून पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात मान्सूनचा जोर वाढेल.

कुठे दिलासा, कुठे प्रतीक्षा?

  • नागपूर : शनिवारी सायंकाळी दीड तास जोरदार पाऊस. २४ तासांत २९.६ मिमी नोंद.
  • गडचिराेली : धानाेरा येथे सर्वाधिक ९०.८ मिमी पाऊस झाला. 
  • गोंदिया : सलग तिसऱ्या दिवशी संततधार, नद्या-नाल्यांमध्ये पाणीच पाणी. 
  • भंडारा, गाेंदिया, वर्धा, चंद्रपूरमध्येही पाऊस झाला. 
  • अकोला : पश्चिम विदर्भात वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत चांगल्या पावसाची नाेंद. 
  • नांदेड : २४ तासात सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी, लातुरात हुलकावणी.


वृद्ध गेला नाल्यात वाहून

चुरडी (ता. तिरोडा, जि. गोंदिया) येथील शालीकराम प्रजापती (८०) हे गावातील नाल्यात निर्माल्य टाकण्यासाठी गेले असता, शनिवारी दुपारी पुरात वाहून गेले.

Web Title: Heavy rainfall expected as Yellow alert for most districts in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.