मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:05 PM2018-07-17T22:05:39+5:302018-07-17T22:14:21+5:30
पुढील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
पुणे : मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे अतिवृष्टी झाली असून कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला़ गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला़ .पुढील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़.
मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात कोकण, गोव्यात जव्हार, मोखेडा १७०, पोलादपूर १४०, शहापूर १२०, भिरा, वैभववाडी, विक्रमगड ११०, कर्जत, महाड, माथेरान १००, कणकवली, मंडणगड, राजापूर, वाडा ९०, चिपळूण, लांजा, संगमेश्वर, देवरुख, उल्हासनगर ७०, अंबरनाथ, खेड, मुरबाड ६० मिमी पावसाची नोंद झाली़. याशिवाय इतरत्र हलक्या पावसाची नोंद झाली आहे़.
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर २७०, राधानगरी १७०, इगतपुरी, लोणावळा १५०, चंदगड, हरसूल, जावळीमाथा, पेठ १४०, ओझरखेडा १३०, गगनबावडा १२०, त्र्यंबकेश्वर, वेल्हे ११०, पौड मुळशी १००, आजरा, कोल्हापूर, शाहुवाडी, सुरगणा ९०, आंबेगाव घोडेगाव, पाटण ८०, भोर, गारगोटी, हातकणंगले ७०, कराड, कोरेगांव, ओझर, वडगाव मावळ, वाई ६०, कागल, पुणे ५० मिमी पाऊस झाला़ . याशिवाय अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता़.
मराठवाड्यात पूर्णा १००, पाथरी ८०, मनवत ७०, औरंगाबाद, नांदेड ५०, बदलापूर, कळंब, मांजलगाव, नायगाव खैरगाव, पैठण ३०, औसा, धर्माबाद, गंगापूर, गेवराई, घनसावंगी, हदगाव, हिमायतनगर, कळमनुरी, लोहा, लोहारा, मुदखेड, परळी वैजनाथ, पाटोदा, सेलूर, शिरुर, अनंतपाल, सोनपेट, तुळजापूर, उमरी, वसमत, वाशी २० मिमी पाऊस पडला़ तसेच बहुतांश ठिकाणी पाऊस पडला़ .
विदर्भात देवरी १९०, सालेकसा १७०, गोरेगांव १३०, मोहाडी ११०, कुरखेडा, रामटेक १००, अर्जुनी मोरगाव, भंडारा, लाखांदूर, साकोली ९०, आमगाव, लाखानी, मौदा, पौनी, पेरसेओनी ८०, आरमोरी, भिवपूर, गोंदिया, कोरची ७०, देसाईगंज, धानोरा, कामठी, सडक अर्जुनी, शिंदेवाही ६०, कुही, नागभीड, सावनेर, तिरोरा ५० मिमी पाऊस झाला़ तसेच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या़.
घाटमाथ्यावरील कोयना २८०, शिरगाव २६०, अम्बोणे, ताम्हिणी २५०, दावडी २१०, लोणावळा, वळवण १६०, डुंगरवाडी १४०, खंद ११०, खोपोली, भिवपुरी १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ मुंबईतील अप्पर वैतरणा १७०, भातसा १००, वैतरणा, मध्य वैतरणा ९०, तानसा ८०, विहार ६०, तुलसी, भांडूप ५० मिमी पाऊस झाला़.
मंगळवारी दिवसभरात पुणे ५, जळगाव १५, महाबळेश्वर ८२, नाशिक १२, सातारा ११, मुंबई १४, औरंगाबाद १०, वाशिम ७, नागपूर ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़.
मॉन्सून सध्या सौराष्ट्र, कच्छ, मध्य महाराष्ट्र या परिसरात जोरदार असून ओडिशा, हरियाना, पूर्व मध्य प्रदेश, गुजरात, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, कर्नाटकाचा अंतर्गत भाग, केरळ या भागात सक्रीय आहे़.
पुढील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.
१९ व २० जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल़. २१ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .
......
महाबळेश्वरला पावसाचा कहर
महाबळेश्वर येथे यंदा पावसाने गेल्या तीन दिवसांपासून कहर केला आहे़. १६ जुलै रोजी सकाळपर्यंत २४ तासात २९९ मिमी पावसाची नोंद झाली होती़. आज १७ जुलैला सकाळपर्यंत २७० मिमी पाऊस झाला़ तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. हे पाहता गेल्या अडीच दिवसात महाबळेश्वरला तब्बल ६५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. ३१ जुले २०१४ रोजी ४३२ मिमी, १५ जुलै २००९ रोजी ४०९ मिमी पावसाची नोंद झाली होती़ .