Heavy Rainfall : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात पुढील दोन दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:47 AM2021-09-28T05:47:58+5:302021-09-28T05:48:32+5:30
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे रूपांतर आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. परिणामी राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद याठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळ उत्तर आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर त्याचा वेग कमी झाला आहे. परंतु आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरित त्याचे झाले आहे. ३०-४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार. पुढील दोन ते तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
२०० मिमी पाऊस कोसळणार
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावात मंगळवारी अतिवृष्टीची शक्यता आहे.