मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:19 PM2021-07-18T12:19:12+5:302021-07-18T12:27:46+5:30

Heavy raining in Mumbai: मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

heavy raining in mumbai affects trains from aurangabad, nanded and other cities | मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देकाही गाड्या रद्द तर काहींचे वेळापत्रक बदलले

औरंगाबाद: शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. भायखळा, सायन, अंधेरीत पाणीच पाणी झालं आहे. पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.  तसेच, मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, भांडूप, कुर्ला, अंधेरी, मालाड, बोरिवली आणि कांदिवली येथील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. 

मुंबईतील या मुसळधार पावसाचा रेल्वेवरही मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर कल्याण ते मुंबई दरम्यान जाणाऱ्या लोकल ट्रेन बंद आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशी एक तास प्रतीक्षा करुन परत घरी जात आहेत. बाहेरून  येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या कल्याण स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत.

मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. 

जालना-मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस रविवारी मनमाडपर्यंतच धावत आहे. तर मुंबई सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली असून, ही रेल्वे नांदेडहून सकाळी 10.05 ऐवजी दुपारी 1 वाजता धावणार आहे.
 

Web Title: heavy raining in mumbai affects trains from aurangabad, nanded and other cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.