जोरदार पावसामुळे ४५ झाडे कोसळली
By Admin | Published: July 4, 2016 01:00 AM2016-07-04T01:00:26+5:302016-07-04T01:00:26+5:30
शनिवारी रात्रीपासून लागून राहिलेल्या पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून, शहरामध्ये रविवारी शहरातील विविध भागांत ४५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या
दोन आरोपींना अटक : टास्कफोर्स पथकाची कारवाई
कुरखेडा : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी चारचाकी वाहन अडवून दोन आरोपींकडून वाहनासह ७ लाख ८५ हजार रूपयांची दारू शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जप्त केली.
या प्रकरणी पोलिसांनी धम्मपाल ढवळे (२३), दीपक मानकर (२३) रा. कढोली यांना अटक केली. गोंदिया जिल्ह्यातून वडसा मार्गाने कुरखेडा तालुक्यात चारचाकी वाहनाने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांना मिळाली. यांच्या नेतृत्वातील टॉस्कफोर्स पथकाच्या पोलिसांनी कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील चिखली फाट्याजवळ पाळत ठेवली. दरम्यान वडेगाव मार्गावरून चारचाकी वाहन येताना दिसले. एमएच ३४ के ८८०१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला अडवून पोलिसांनी या वाहनाची झळती घेतली. यावेळी वाहनात देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी सदर दारू जप्त केली व वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपी धम्मपाल ढवळे, दीपक मानकर यांना अटक करून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), ९८ अन्वये कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कटारे करीत आहेत. कारवाई केलेल्या पथकामध्ये कुरखेडाचे ठाणेदार विलास सूपे, टॉक्सफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक एम. एन. पवार, पोलीस हवालदार संतोष धोटे, वसंत जोंजाळकर, रमेश मडावी यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)