येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:14 AM2020-08-12T00:14:15+5:302020-08-12T00:14:33+5:30

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असून, येत्या ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ...

Heavy rains in Konkan, Central Maharashtra in next 48 hours | येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

येत्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत असून, येत्या ४८ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ७.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी रात्री ११ वाजता चेंबूर येथील तळमजला अधिक पाचमजली इमारतीच्या खोली क्रमांक १०४ मधील प्लास्टरचा काही भाग कोसळला. यात दोन महिला किरकोळ जखमी झाल्या, तर सोळा ठिकाणी झाडे कोसळली. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. बुधवारी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Heavy rains in Konkan, Central Maharashtra in next 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस