कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 08:04 PM2020-07-08T20:04:46+5:302020-07-08T20:05:27+5:30

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा

Heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra | कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देमहाबळेश्वरमध्ये बुधवारी दिवसभरात जोरदार वृष्टी

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात रत्नागिरी १४०, कणकवली १३०, माथेरान १२०, रोहा, ठाणे ११०, कल्याण, मालवण १००, बेलापूर, देवगड, दोडामार्ग, मुरुड, पनवेल, सांगे, सावंतवाडी, उरण ९०, पालघर, पेडणे, केपे, रामेश्वर, वाडा ८०, हरनाई, जव्हार, खालापूर, महाड, माणगाव, शहापूर, सुधागड पाली, वेंगुर्ला ७०, अंबरनाथ, कर्जत, म्हसळा, मुंबई (सांताक्रुझ), पुणे, उल्हासनगर, वैभववाडी ६०, वसई, विक्रमगड ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
मध्य महाराष्ट्रात आजारा, राधानगरी १२०, चांदगड १००, गगनबावडा, लोणावळा ९०, महाबळेश्वर ८०, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वेल्हे ७०, गडहिंग्लज ६०, गारगोटी, पन्हाळा ५० मिमी पाऊस पडला. मराठवाड्यातील घनसावंगी, माहूर ३०, अंबड, अर्धापूर, आष्टी, औंधा नागनाथ, गेवराई, हदगाव, हिंगोली, नांदेड, परंडा, पाटोदा २० मिमी पाऊस झाला. विदर्भात देऊळगाव राजा, जळगाव जामोद, मालेगाव, मलकापूर, रिसोड, सिंधखेड राजा येथे १० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावरील ताम्हिणी ११०, शिरगाव, अम्बोणे, दावडी ९०, खोपोली ८०, कोयना, धारावी ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने ९ ते ११ जुलै दरम्यान पंजाब, हरियाना, चंदीगड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमालयीन रांगा, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
९ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
 

महाबळेश्वरला दिवसभरात ९६ मिमी
बुधवारी दिवसभरात महाबळेश्वरमध्ये जोरदार वृष्टी झाली. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९६ मिमी पावसाची नोंद झाली होती. रत्नागिरी ५१, पणजी ४५, मुंबई ५, सांताक्रुझ १२, सोलापूर ३३, कोल्हापूर ५, परभणी १७, अकोला ९, अमरावती व पुणे २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Heavy rains in Konkan, Goa and Central Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.