कोकण, गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; राज्यात जोर ओसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 06:47 PM2020-06-18T18:47:53+5:302020-06-18T18:48:58+5:30

राज्यात सर्वाधिक पाऊस राजापूर येथे झाला. तिथे सरासरी 190 मिमी पाऊस पडला.

Heavy rains receded in the state; In Konkan, however, batting continues | कोकण, गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; राज्यात जोर ओसरला

कोकण, गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; राज्यात जोर ओसरला

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी ,सिंधुदुर्गला जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता

पुणे : कोकण, गोव्यात सध्या पावसाचा जोर असून राज्याच्या अन्य भागातील पावसाचा जोर कमी झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राजापूर येथे गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. राज्यात सर्वाधिक १९० मिमी पाऊस राजापूर येथे झाला. श्रीवर्धन १७०, मालवण, वेगुर्ला १६०, लांजा, सावंतवाडी १५०, मार्मागोवा १४०, दापोली, पेडणे १३०, रत्नागिरी १२०, दाभोलीम, कुडाळ, मुळदे, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ११०, देवगड, कणकवली १००, दोडामार्ग, गुहागर, हरनाई, म्हसळा, रामेश्वरी ९०, चिपळूण, खेड, मंडणगड ७०, कोणकोण, मडगाव, वाल्पोई ६०, पोलादपूर, केपे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.याशिवाय इतरत्र हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रात गगनबावडा ११०, चांदगड ८०, महाबळेश्वर, शाहुवाडी ७०, पन्हाळा, राधानगरी, सिन्नर ६०, आजरा, गारगोटी ५०, गडहिंग्लज, , पाटण, शिराळा ४०, कागल, खेड, खेड राजगुरुनगर, पुणे लोहगाव ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील परळी वैजनाथ ४०, धर्मबाद ३०, उमरगा १० मिमी पाऊस झाला. विदर्भात सिरोंचा २०, अहिरी, काटोल, मुल १० मिमी पाऊस झाला. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना (पोफळी) ४०, ताम्हिणी, ३०, दावडी, डुंगरवाडी, शिरगाव, अम्बोणे २० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
कोकण वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवसात मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात १९ ते २२ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २१ व २२ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे शहर गेल्या २४ तासात गुरुवारी सकाळपर्यंत २१.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. लोहगाव येथे २७़३, पाषाण येथे ५.४ मिमी पाऊस झाला होता. पुढील दोन दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Heavy rains receded in the state; In Konkan, however, batting continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.