सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:55 PM2020-09-22T20:55:30+5:302020-09-22T20:56:31+5:30

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

Heavy rains in Sidhundurg district; Heavy rains in Central Maharashtra, Marathwada | सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस 

Next
ठळक मुद्देकोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

पुणे : अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीमुळे कोकण, गोव्यात जोरदार पाऊस झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाडा व विदर्भात बहुसंख्य ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. 
दिवसभरात वर्ध्यात ५२ मिमी
मंगळवारी दिवसभरात मुंबई १७, सांताक्रुझ २१, अलिबाग १०, रत्नागिरी १३, औरंगाबाद १९, अकोला १३, वर्धा ५२, कोल्हापूर ९, महाबळेश्वर ७, नाशिक ८ मिमी पाऊस पडला. 
२३ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता असून ठाणे, मुंबईत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
़़़़़
वेंगुर्ला २६४, मालवण २५४, रामेश्वर २४०, पणजी १७३, दोडामार्ग १५०, कुडाळ १४०, सिरसी १३८, मडगाव, पेडणे, फोंडा १३०, दिंडोरी ९३, कुही ९०, शिरुर अनंतपाल ९०, औरंगाबाद ५८ मिमी़

Web Title: Heavy rains in Sidhundurg district; Heavy rains in Central Maharashtra, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.