अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:07 AM2018-10-10T06:07:17+5:302018-10-10T06:09:40+5:30

राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.

Heavy water shortage in half the area of ​​Maharashtra drought, severe water shortage in 200 talukas | अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

Next

पुणे : राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.
राज्याच्या कृषी विभागाने पीकपाण्यासंदर्भात तयार केलेल्या अहवालात टंचाईसदृश परिस्थितीचे अनुमान काढले आहे. यंदा ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १२१ तालुक्यांत ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

नागपुरात किडीचा प्रादुर्भाव
नागपूर विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणाºया किडीचा व शेंदरी बोंडअळीचा, भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.

विभागनिहाय तालुक्यातील पावसाची स्थिती
विभाग तालुके २५ ते ५० ५० ते ७५ ७५ ते १०० १०० पेक्षा जास्त
कोकण ४७ -- ०३ २५ १९ तालुके
नाशिक ४० ०५ २२ ११ ०२
पुणे ३९ १३ १६ ०४ ०६
कोल्हापूर ३३ ०१ ०९ १२ ११
औरंगाबाद २८ ०५ २१ ०२ --
लातूर ४८ ०३ २६ १३ ०६
अमरावती ५६ ०१ २४ २४ ०७
नागपूर ६४ -- २२ ३० १२

प्रत्येक वेळी केंद्रावर अवलंबून राहावे लागते
वेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने ‘दुष्काळ’ शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जनावरांना चारा-पाण्याची सोय करावी. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे.
- बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

Web Title: Heavy water shortage in half the area of ​​Maharashtra drought, severe water shortage in 200 talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.