मृत्यूनंतरही नरकयातना....!
By admin | Published: August 4, 2016 06:08 PM2016-08-04T18:08:56+5:302016-08-04T18:08:56+5:30
जिल्हयातील मालेगाव येथे बौध्द समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, शव ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा नाही.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ४ : जिल्हयातील मालेगाव येथे बौध्द समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही, शव ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचे गुरुवारी दिसून आले.
मालेगाव शहरातील निवृत्ती शहाजी घुगे नामक व्यक्तिचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बौध्द समाजाच्या स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. आधि रस्त्यावरील खड्डे चुकवित जात असतांनाच मधात असलेल्या खड्डयांमधून टोंगळया एवढया पाण्यातून किडी नेण्याची वेळ नागरिकांवर आली.
त्यानंतर कसेबसे स्मशानभूमीवर पोहचले तर तेथे शव ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा नसल्याने वाढलेली झाडे झुडपे तोडून व्यवस्था करावी लागली. शवाला जाळण्यासाठी असलेले शेडचीही दुरावस्था झाली आहे. एखादयावेळी पाऊस सुरु झाल्यास शवाला अग्नि देतांना तास न तास नागरिकांना प्रतिक्षा करावी लागते. याकडे मात्र कुणाचे लक्ष नसणे अतिशय गंभीर बाब आह.