कुंचल्यांना सलाम!
By admin | Published: May 5, 2016 06:28 AM2016-05-05T06:28:16+5:302016-05-05T06:53:53+5:30
जगभर ५ मे हा ‘व्यंगचित्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. १८९५ मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंगाची उधळण असलेल्या ‘द येलो किड’ या
जगभर ५ मे हा ‘व्यंगचित्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. १८९५ मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंगाची उधळण असलेल्या ‘द येलो किड’ या कॉमिकचे प्रकाशन झाले होते. निर्माते होते रिचर्ड एफ आऊटकल्ट. ‘द येलो किड’ला वर्तमान युगातील कार्टूनचा प्रारंभ मानला जातो. त्यामुळेच आजचा दिवस व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यातून रेखाटल्या गेलेल्या रेषांमधील व्यंगाच्या प्रखर, तितक्याच बोचऱ्या अभिव्यक्तीला सलाम करण्याचा दिवस आहे. लोकमत समूहाने व्यंगचित्रांची महती आणि त्याच्या शक्तीची नेहमीच प्रशंसा केली आहे. लोकमत समूह हा भारतातील असा एकमेव समूह आहे, ज्याने महान कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांची सदाबहार व्यक्तिरेखा ‘कॉमन मॅन’ला एक दिवसासाठी आपल्या वृत्तपत्राचे ‘गेस्ट एडिटर’ बनविले होते. दिवस होता ५ फेब्रुवारी २०१२. आजच्या अंकाचे अतिथी संपादक प्रख्यात व्यंग्यचित्रकार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडलेली काही खालील व्यंग्यचित्रे.
आर. के. लक्ष्मण
बाळासाहेब ठाकरे
जॅक डेव्हिस
डेव्हिड लो
मॉर्ट ड्रकर
मॅक
लेस्ली इलिंग वर्थ
शि. द. फडणीस
स्ट्र्युब
फिलिफ झेक
वसंत सरवटे
व्यंगचित्रांचे आणि वाचकांचे नाते शतकानुशतके आहे. जगभरात व्यंगचित्रकारांना मोठा मानसन्मानही मिळाला आहे. पानभर लेख लिहून जो परिणाम होत नाही, तो एका सिंगल किंवा तीन कॉलममधील व्यंगचित्रांने सहज साधल्याची शेकडो उदाहरणे आहेत. आपल्या देशात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांनी पिढ्या घडवल्या. बोचऱ्या फटकाऱ्यांनी लोकांना हसवले. अनेकांना घायाळही केले. जगात व्यंगचित्रे काढणारे जे मोजके नामवंत होते किंवा आज आपल्यात आहेत, त्यांची त्या त्या काळात गाजलेली ही काही व्यंगचित्रे राज ठाकरे यांच्या संग्रहातून...