हॅलो तावडे साहेब मी आत्महत्या करतोय...

By Admin | Published: October 6, 2016 11:15 PM2016-10-06T23:15:34+5:302016-10-06T23:15:34+5:30

हॅलो शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब मी विनाअनुदानित शाळेचा शिक्षक बोलतो ... साहेब... विनाअनुदानित शाळेत बिनपगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या

Hello Tawde Saheb I'm committing suicide ... | हॅलो तावडे साहेब मी आत्महत्या करतोय...

हॅलो तावडे साहेब मी आत्महत्या करतोय...

googlenewsNext

- श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि.06 -  हॅलो शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेब मी विनाअनुदानित शाळेचा शिक्षक बोलतो ... साहेब... विनाअनुदानित शाळेत बिनपगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या करत आहे... असा फोन केला... अन् फोन कट करुन स्विच ऑफ केला.यामुळे शिक्षण मंत्र्यांसह पोलीस यंत्रणा खड़बडून जागी झाली... अखेर त्या शिक्षकाला पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.
सिल्लोड तालुक्यातिल कायगांव येथील नँशनल मराठी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आसलेले शिक्षक समाधान बाजीराव पांढरे हे बिन पगारी काम करत असल्याने त्यांनी चक्क (दि. 5-रोजी ) शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना फोन करुन साहेब... बिन पगारी काम करतोय आता सहन होत नाही ... मी आत्महत्या करत आहे... असा फोन केला आणि फोन कट केला. यानंतर लगेच फोन स्विच ऑफ केला. या प्रकारानंतर  शिक्षण मंत्र्यांनी पीएमार्फत त्या शिक्षकाला कॉल केला पण फोन लागत नव्हता. त्याने खरच आत्मह्त्या तर केली नाही. या भीतीने शिक्षण मंत्र्यांनी आलेला नंबर अख्या महाराष्ट्रातील पोलीस अधिक्षक कार्यालयास कळविला.

त्या शिक्षकास कुठल्याही परस्थित शोधा असे आदेश येताच औरंगाबादवरुन सिल्लोड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनला फोन येऊ लागले. फोनची दखल घेत त्या नंबरची चौकशी सुत्रे काही क्षणातच चालु झाले पंरतु तो नंबर कोणाचा आहे, हे कळत नसल्याने पोलीसांनी शेवटी मोबाईल लोकेशन्स घेतला असता तो मोबाईल नंबर सिल्लोड परिसरातील टाॅवर अंर्तंगत दिसुन आल्याने पोलिसांची पुन्हा धावपळ वाढली. शेवटी विनाअनुदानित कोणत्या शाळा या परिसरात आहे. त्यानुसार शोध मोहीमेस सुरुवात करण्यात आली. अन शेवटी कायगांव येथील नँशनल मराठी शाळेच्या मुख्यध्यापकाचा नंबर असल्याचे कळताच पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याला ताब्यात घेतले. हा शिक्षक वडोद बाजार पोलिसांच्या ताब्यात आहे. रात्री उशीरा पर्यन्त त्याचे जाब जबाब पोलीस घेत होते.

दरम्यान, एकंदरित काय तर एका शिक्षकाने पोलीस आणि  शिक्षण विभागाच्या कर्मचा-यांची झोप उडविली. 

Web Title: Hello Tawde Saheb I'm committing suicide ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.