समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत मदत
By admin | Published: August 9, 2014 11:23 PM2014-08-09T23:23:36+5:302014-08-09T23:23:36+5:30
रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आर. एम. फाउंडेशनच्या वतीने शिरूर, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन तालुक्यांतील 75 शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटांचे वाटप करण्यात आले.
Next
>शिरूर : रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आर. एम. फाउंडेशनच्या वतीने शिरूर, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन तालुक्यांतील 75 शाळांना पुस्तके व ग्रंथालय कपाटांचे वाटप करण्यात आले. अमृतमहोत्सवानिमित्त फाउंडेशनने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविताना समाजाच्या शेवटच्या घटकार्पयत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचे फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांनी सांगितले.
रामलिंग (शिरूर ग्रामीण) येथे शोभाताई धारिवाल सभामंडपात रसिकलाल धारिवाल व शोभाताई यांच्या हस्ते शाळांना पुस्तके व कपाटांचे वाटप करण्यात आले.
1 लाख झाडे लावण्यात आल्याचे सांगून शोभाताई म्हणाल्या, फाउंडेशनतर्फे 2क्क्6 पासून दर वर्षी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील हुशार विद्याथ्र्याना एक कोटीर्पयत शिष्यवृत्ती वाटपही केले जाते. या वेळी विद्याधाम प्रशलेचे अध्यक्ष चंद्रकांत बाफना, गोडोजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भानुजी कर्नावत, फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश धारिवाल, पांजरपोळचे अध्यक्ष रमणलाल बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. शिरूर शहर विकास आघाडीचे नेते माऊली पठारे, उद्योगपती किशोर खाबिया यांनी मनोगत व्यक्त केले.
वाघाळ्याचे माजी सरपंच कुंडलिकराव थोरात, सरदवाडीचे माजी सरपंच विलास कर्डिले, रामलिंग देवस्थानचे विश्वस्त घावटे, खजिनदार किसनराव खेडकर, सुभाष गांधी, विनोद धारिवाल आदी उपस्थित होते. मातोश्री मदनबाई धारिवाल रुग्णालयाचे व्यवस्थापक अंबरिश सूर्यवंशी यांनी प्रस्ताविक केले, सहायक व्यवस्थापक डॉ. शेखर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक प्रतिनिधींतर्फे प्रा. जाधव, रामराव पवार यांनी धारिवाल दाम्पत्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले. (वार्ताहर)
आरोग्य शिबिरातून रूग्णांना दिलासा
या वेळी बोलताना शोभाताई म्हणाल्या, धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त 1 मार्च 2क्13 पासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 16 फेब्रुवारी 2क्14 ला घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 26 हजार रक्तबॅगा जमा होऊ शकल्या. डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली 21क् जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कृत्रिम अवयव व कृत्रिम नेत्र प्रत्यारोपण मोफत शिबिरात 1क्क् हून अधिक रुग्णांना याचा फायदा मिळाला. प्लॉस्टिक व कॉस्मेटिक सजर्रीचे मोफत शिबिर, वंध्यत्व निवारण आदी शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.