तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:31 PM2018-01-13T23:31:10+5:302018-01-13T23:37:19+5:30

जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

With the help of technology, regional languages ​​can be developed along with Hindi - Governor | तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल

तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल

Next

मुंबई : जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यामुळे त्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले. केंद्र शासनाच्या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंदी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, देशातील एकात्मता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हिंदीचे योगदान महत्त्वाचे आहे. विनोबा भावे यांनी भूदान आंदोलनाच्या यशस्वीतेचे श्रेय हिंदीला दिले. महात्मा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी राजभाषेचा आग्रह धरला. त्यामुळे हिंदी बोलण्याचा संकोच बाळगू नये.
प्रभास कुमार झा म्हणाले, राजभाषा विभागाने देशातील १४ भाषांतून सोप्या पद्धतीने हिंदी शिकण्यासाठी ‘लीला’ मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. या कार्यक्रमात शासकीय मध्य विभाग आणि पश्चिम विभागातील केंद्र शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीयीकृत बँका आदींना कामकाजात हिंदीचा अवलंब केल्याबद्दल २०१७साठीचा ‘राजभाषा पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते दिला.

सांस्कृतिक कार्य विभागाने मागे राहू नये
मातृभाषा चांगल्या प्रकारे येत असल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाºया मुलांनी आपल्या भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन राज्यपालांनी केले. आज चीन, कोरियासारख्या देशांना जुन्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या पटकथांविषयी कुतूहल असताना सांस्कृतिक कार्य विभागानेही यात मागे न राहता हिंदीमध्ये रूपांतरण करण्याचे काम करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

Web Title: With the help of technology, regional languages ​​can be developed along with Hindi - Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.