हेलपाटेच.!

By admin | Published: November 11, 2014 11:42 PM2014-11-11T23:42:29+5:302014-11-11T23:42:29+5:30

शासनाकडून एका बाजुला ऑनलाईन सातबारा उतारा देण्याची तयारी केली जात असताना जिल्ह्यातील अ नेक गावांत तलाठी कार्यालयाला इमारतीच नाहीत.

Helpatate.! | हेलपाटेच.!

हेलपाटेच.!

Next
शासनाकडून एका बाजुला ऑनलाईन सातबारा उतारा देण्याची तयारी केली जात असताना जिल्ह्यातील अ नेक गावांत तलाठी कार्यालयाला इमारतीच नाहीत. तर दुस:या बाजुला तलाठी भाऊसाहेबांना शहरी भागात राहण्याचे आकर्षण असल्याने नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत. एकाच तलाठय़ाकडे चार-पाच गावांचा कारभार असल्याने प्रत्येक ठिकाणी दुस:या गावात गेल्याचे सांगण्यात  येते. त्यामुळे शेतक:यांचा सात-बारा उता:यासह अनेक कागदपत्रंसाठी ताटकळा होत आहे. ‘लोकमत’ने मंगळवारी दुपारी जिल्ह्यात ‘स्टिंग ऑपरेशन’ करून घेतलेला आढावा..
 
पुरंदरमध्ये डिसेंबरअखेर मिळणार ऑनलाईन सात-बारा
दिवे : पुरंदरमध्ये तहसील कार्यालयात संपूर्ण तालुक्याचे शेतजमीन व सव्र्हे नंबर असलेले गट यांचे संगणकावर माहिती संकलित करण्याचे काम वेगात सुरूआहे. खातेदारांच्या हातात या डिसेंबरअखेर ऑनलाईन सात-बारा पडेल, असे नायब तहसीलदार दिनेश पारगे यांनी सांगितले. 
याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले, की जमाबंदी आयुक्तांच्या आदेशानुसार गेली सात-आठ महिने संगणकावर माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. आता ते अंतिम टप्प्यात आहे. पुरंदरमध्ये एकूण 1क्1 गावे आहेत. सातबारा खातेदारांची संख्या 1क्3127 आहे. सासवड, जेजुरी येथे नगरपालिका आहेत. त्यामुळे या दोन्ही गावांत सव्र्हे नंबर नोंद आहे. या नोंदीचे काम 99 टक्के पूर्ण झाले असून, लवकरच प्रिंटआऊट काढून पुन्हा काही सात-बारावर दोष आढळल्यास दुरुस्त करून काम पूर्ण करणार आहेत. यानंतरच खातेदाराला त्याचा सातबाराची राज्यपातळीवर कोठेही माहिती घेता व देता येईल.  एखादा शेतकरी आपल्या जमिनीचा व्यवहार खरेदी किंवा विक्री करेल तर त्याची नोंद रजिस्टर ऑफिसकडून त्या भागातील तलाठय़ाकडे जाईल. तलाठी ते खरेदी अथवा विक्री खत तपासून सर्कलकडे पाठवेल. 
 
4ज्या गावात तलाठी जातो त्या प्रत्येक ठिकाणी तलाठी कार्यालय असतेच असे नाही. मुख्य गावात जरी तलाठी कार्यालय असले तरी एखादा टेबल व मोडके कपाट असते. विद्युतपुरवठा असला तर असला नाही तर शेजारून लाईट घेतली जाते, अशा वातावरणात तलाठी संगणक कसा वापरणार? सध्या तरी तलाठी हस्ताक्षरात नोंद केलेला सातबारा आपल्या सही व शिक्क्यानिशी देतो.  त्यासाठी खातेदाराला दहा रुपये सेवाशुल्क द्यावे लागते. 
 
भोर-मुळशीतून पुढील महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन उतारे
4 भोर : अनेक गावात संगणक कक्ष तयार करण्यात आले आहेत. मात्र 7/12 संगणकीकरणाचे काम अपूर्ण असल्याने तालुक्यातील एकाही गावात अॅनलाईन 7/12 उतारा मिळत नाहीत. सध्या फक्त तहसिल कार्यालयातील संगणक कक्षातून उतारे दिले जातात. विविध नोंदीबाबतचा संपूर्ण डाटा भरुन झाला असून त्याची ट्रायल सुरु आहे. हे काम पुर्ण झाल्यावर येत्या महिनाभरात संपुर्ण जिल्हात प्रायोगिक तत्वावर भोर व मुळशी तालुक्यात ऑॅनलाईन उतारे देण्यास सुरवात होईल असे तहसिलदार राम चोबे यांनी सांगितले. 
4तहसिल कार्यालयाकडून तलाटय़ांना लॅपटॉप, प्रिंन्टर, डेटाकार्ड, डिजीटल सिंग्नेचर, चेंजरनेम, पासवर्ड देण्यात आले असून तलाठय़ांना प्रशिक्षण दिले आहे. प्रत्य्ेाक गावात संगणक कक्ष तयार केला असून ऑॅनलाईन नोंदणी व सर्टीफाईल करण्याचे व चुका दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. आतापयर्र्त 9क् टक्के काम पूर्ण झाले असून महिनाभरात ते पूर्ण होईल.
4दुर्गम डोंगरी भागामुळे अनेक गावात विज, इमारत, फोनच्या सोयी सुविधा नाहीत. यामुळे तलाठी कार्यालये मुख्यालयाच्या ठिकाणी आहेत. त्याच ठिकाणी भाउसाहेब असतात.
4तलाठी गावात राहात नसल्याने 15 दिवस ते एक महिना ते लोकांना भेटत नसल्याने लोकांनाच तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. भाऊसाहेब भेटले नाही तर रिकाम्या हातानेच परत जावे लागते. ऑनलाईन उतारे सुरु नसल्याने ङोरॉक्स किवा हाताने लिहून उतारे दिले जातात. यासाठी एका उता:याला 2क् रुपयापासुन पुढे पैसे घेतले जातात. विविध दाखलेही वेळेवर मिळत नाहीत.
 
तलाठी कार्यालयाला इमारतच नाही
शेटफळगढे : इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे व निरगुडे तलाठी कार्यालयाला इमारतीच नाहीत. गावाने उपलब्ध करून दिलेल्या खोलीतून कारभार चालत असला तरी निरगुडे येथील इमारतीत विजेची व्यवस्थाच नाही. 
शेटफळगढे येथील गाव कामगार तलाठी कार्यालयातून पिंपळे, लामजेवाडी या गावास तीन गावचा कारभार चालतो. तर निरगुडे या कार्यालयातून निरगुडे आणि म्हसोबाचीवाडी या दोन गावचा कारभार चालतो. या दोन्ही गावातील कार्यालयात संगणकच नाहीत. तसेच, या दोन्ही मुख्य गावाच्या कार्यालयाच्या इमारतीसुद्धा नाहीत. दोन्ही ठिकाणी कार्यालयासाठी गावाने खोल्या उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामधील शेटफळगढे गावच्या कार्यालयात विजेची सोय आहे. मात्र, निरगुडे येथे मात्र विजेचीही सोय नसल्याने संगणक उतारे कसे उपलब्ध होणार, हा प्रश्न या भागातील शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. 
शेटफळगढे येथील गाव कामगार तलाठी सतिश गायकवाड यांना याबाबत विचारले असता संगणकमध्ये इंदापूर येथे माहिती भरण्याचे काम पूर्ण होत आले आहे. लवकरच संगणकीय सातबारे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तर निरगुडे येथील तलाठी यांनी सुद्धा संगणकावर सातबारे उतारे यांची माहिती भरण्याचे काम पूर्ण होत असल्याचे सांगितले. मात्र, या दोन गावच्या शेतक:यांना संगणक उतारे मिळण्यासाठी लागणारे संगणक ते ठेवण्यासाठी लागणारी इमारत आणि वीज या तीन ही गोष्टींचा अभाव आहे. संगणक उतारे मिळण्याबरोबरच या दोन्ही गावांना कार्यालयासाठी इमारत तात्काळ उपलब्ध व्हावी, अशी मागणी  ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 
 
संगणकीकरणापासून दूरच
4बारामती : शहरातील सुविधा केंद्र, तलाठी कार्यालयदेखील संगणकीकरणापासून दूर आहे.   शहरालगत असणा:या तांदुळवाडी येथील तलाठी कार्यालय मंगळवारी(दि 11) बंद होते. 
4तांदुळवाडी  परीसराचा यापूर्वी ग्रामपंचायातीमध्ये समावेश होता. सध्या हा परिसर बारामती नगरपरीषदेमध्ये समाविष्ठ झाला आहे. तसेच छोटय़ाशा गाळ्यात सुरू असणा:या तलाठी कार्यालयासाठी  बांधलेल्या स्वतंत्र इमारतीत कार्यालय स्थलांतरीत झाले आहे. कोतवालाच्या मोबाइल वर ‘सातबारा पाहीजे’ म्हणून संपर्क साधण्यात आला. यावेळी  कोतवाल पिसाळ यांनी ‘पिकपाणी‘ साठी जैनकवाडी येथे तलाठी भाऊसाहेबांसमवेत असल्याने तलाठी कार्यालय बंद होते.
4तर सुविधा केंद्रात संगणकीकरणाच्या कामामुळे ऑनलाईन सातबारे देणो बंद असल्याची सूचना लावण्यात आली आहे. 26 जून 2क्14 पासून ही सुविधा बंद ठेवण्यात आल्याचे या सुचनेत लिहले आहे. बारामतीसह 117 गावांच्या संगणकीकरण करण्याचे काम सुरू असल्याने ही सुविधा बंद आहे असेही या सुचनेत लिहले आहे. 
 
खेड तालुक्यात  तलाठय़ांनी घेतले स्वखर्चातून लॅपटॉप, प्रिंटर 
4चाकण : खेड तालुक्यात ऑनलाईन  उता:यांच्या कामासाठी तलाठय़ांना स्वखर्चाने लॅपटॉप व प्रिंटर घ्यावे लागल्याची माहिती  तलाठय़ांनी दिली. 
4याबाबत कामगार तलाठी अशोक सुतार म्हणाले की, ‘‘चाकण गावच्या हद्दीत 2556, खराबवाडीत 472, मेदनकरवाडीत 521, कडाचीवाडीत 749 व नाणोकरवाडीत 5क्1 असे एकूण 4799 गट नंबर्स आहेत. त्यांचे पोटहिस्से धरून 15 ते 2क् हजार 7/12 उतारे आहेत. हे सगळे उतारे आम्ही फीड करून प्रिंट काढल्या व तपासणी केली असून, 1क्क् टक्के काम झाले आहे. आता फक्त मंडल अधिका:यांकडून  तपासून दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मूळ उता:यावरून दुरुस्त्याही केल्या आहेत. जमीनमालकाचे नाव, क्षेत्न, भोगवटादार अशा चुकांची दुरुस्ती केली आहे.  
4याबाबत नायब तहसीलदार माणिकराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘खेड तालुक्यात अंदाजे 1 लाख 5क् हजाराहून जास्त 7/12 उतारे आहेत. त्यांचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नागरिकांना 1क्क् टक्के ऑनलाईन 7/12 उतारे मिळतील. 
 
   ई- चावडी संकल्पना पुढे आल्याने आपण प्रत्येक गावामध्ये ऑनलाईन सातबारा उतारे देणार आहोत त्याचे काम सध्या अंतिम टप्पात आहे. या सॉफ्टवेअर मध्ये काही त्रुटी होत्या परंतु शासनाने सर्व त्रुटी दुर केल्या आहेत. काही  सातबारा उतारा व फेरफार मध्ये वेगवेगळे प्रकार असतात त्यानुसार सॉफ्टवेअर तयार करावे लागते त्यामुळे वेळ जात आहे. सातबारा फीडींगचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे डिसेंबर पर्यत ते पूर्ण होईल.                प्रशांत आवटे, तहसीलदार खेड
 
कार्यालयच नाही, तर ऑनलाईन कुठून?
आंबेठाण : ऑनलाईन सात-बारा देण्याच्या घोषणा करण्याअगोदर शासनाने सजा असणा:या ठिकाणी तलाठय़ांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि मग पारदर्शक कारभाराच्या वल्गना कराव्यात, असा संतप्त सूर शेतक:यांनी व्यक्त केला. 
ज्या ठिकाणी सजा (तलाठी कार्यालयाचे अधिकृत ठिकाण ) आहे त्या ठिकाणी तलाठी कार्यालय हवेच असते परंतु जागाच उपलब्ध नसल्याने उपलब्ध असणा-या जागेचा शोध घेऊन गाव कामगार तलाठी यांना आपले काम चालवावे लागत आहे. काही कार्यालयात सातबारा विषयी असणा-या नोंदी पूर्णपणो अपडेट करण्यात आलेल्या नाहित. त्या नोंदी अपडेट करण्याचे काम सुरु आहे. 
आंबेठाण सजाचे तलाठी गणोश सोमवंशी यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते म्हणाले कि ऑनलाईनचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाला अजून दोन महिने तरी लागेल असा अंदाज आहे. तसेच वराळे सजा मध्ये वराळे, कोरेगाव खुर्द, गोनवडी, भाम्बोली, आणि पिंपरी खुर्द या गावांचा समावेश असून आंबेठाण सजा मध्ये आंबेठाण, वाकी खुर्द, रोहकल, बोरदरा, आणि बिरदवडी या गावांचा समावेश होतो. या पैकी बराचसा भाग औद्योगिक क्षेत्रचा येत असल्याने गाव कामगार तलाठय़ांवर काम करताना मोठा बोजा पडत आहे. 
 
तलाठय़ांनीच  खरेदी केले 
लॅपटॉप अन् प्रिंटर
4ऑन लाईन सात-बारे देताना त्यासाठी आवश्यक असणारे संगणक किंवा लेपटोप हे संबधित तलाठी यांनीच खरेदी केलेली आहेत. सातबारा प्रिंट करण्यासाठी त्यांना प्रिंटर देखील स्वत: खरेदी करावे लागले आहेत. या साठी फक्त इंटरनेट चे कनेक्शन घेण्यासाठी शासनाने तरतूद केल्याची माहिती  मिळाली. 
4या संगणक, प्रिंटर, आणि इंटरनेट यांचा खर्च भागविण्यासाठी वेगळी शक्कल लढविण्यात आली असून पूर्वी सातबारा देण्यासाठी 5 रुपये घेण्याची तरतूद असल्याचे या वेळी नजरेस पडले. परंतु आता मात्र शेतक-यांना यासाठी 15 रुपये मोजावे लागत आहे. यामुळे त्यांची लुट होत आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहित नसल्याने तेही ही रक्कम काही न बोलता देतात
 
तलाठी गैरहजर, ग्रामस्थांपुढे अडचणी
देऊळगावराजे : दौंड तालुक्याच्या पूर्व  भागातील देऊळगावराजे सर्कल, रावणगाव सर्कल अंतर्गत गावकामगार तलाठी तसेच सर्कल रुजू असलेल्या सजामध्ये राहत नसल्याने शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. 
शेतक:यांच्या समस्या सोडविण्याच्या हेतूने शासनाने तलाठी व सर्कल यांची रुजू असलेल्या सजामध्येच वास्तव्य बंधनकारक असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. 
शासनाने कोटय़ावधी रुपयांचा निधी खर्च करुन पूर्व भागातील देऊळगावराजे, शिरापूर, मलठण, राजेगाव, रावणगाव, बोरीबेल तलाठी  कार्यालये बांधण्यात आली आहेत. परंतु येथील सर्वच कार्यालयामध्ये पिण्याचे पाणी, विद्युत जोड, शेफ्टी डोअर या सारखे कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने अर्धवट स्वरुपाच्या कामकाज झाले आहे. परिणामी याठिकाणी तलाठी कार्यालये सुरु नसल्याने शेतक:यांना दौंड जावे लागत. दौंड येथे एकाच खोलीत पूर्व भागातील सर्व गावांचे महसूली कामकाज चालते. याठिकाणी शेतक:यांना येऊन 7/12, 8 अ, यासारखी कागदपत्रंची पूर्तता करावी लागत आहे. 
यासंदर्भात मलठण (ता. दौंड) येथील बाळू वाळके, विठ्ठल भोसले, शशिकांत शेळके म्हणाले की, सर्कल व तलाठी गावात येत नसल्याने गावातील शेतकरी हैराण झाले अहेत. तर देऊळगावराजे येथील रुक्मिणी जाधव म्हणाल्या की, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दौंड जावे लागत आहे. 
याबाबत गावकामगार तलाठी हुशेन शेख व अभिमन्यू जाधव म्हणाले की, शासनाने बांधलेली कार्यालये अधर्वट स्वरुपात असल्याने कामकाजात अडचणी येत आहेत. आम्हाला शासनाने लॅपटॉप दिले मात्र शासनाच्या 1 ते 16 मुद्यांमुळे आम्हाला तहसीलदारांचा आदेश आल्याशिवाय लॅबटॉप चालू करता येत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 
 
पूर्व भागातील अनेक तलाठी कार्यालये बंद
4शिरसगाव काटा : शिरूरच्या पूर्व भागात ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत अिनेक तलाठी कार्यालये बंद आढळली. तर, इनामगाव येथील तलाठी कार्यालय तलाठी भाऊसाहेबांच्या गैरहजेरीत सुरूच होते. 
4पूर्व भागात निर्वी गावच्या कार्यालयात कोळगाव डोळस व निर्वी, शिरसगाव येथील तलाठी कार्यालयात धुमाळवाडी व शिरसगाव, तसेच इनामगाव येथील तलाठी कार्यालयात ¨पपळसुटी व इनामगाव या गावाचे एकत्रित कामकाज पाहिले जाते. 
4शिरसगाव काटा, निर्वी या गावांची तलाठी कार्यालये बंद होती व इनामगाव येथील कार्यालयात तलाठी भाऊसाहेबांच्या अनुपस्थितीत नागरिकांनी गर्दी केली होती. या संदर्भात मंडलाधिकारी एस. एस. मिरे यांना विचारले असता, तलाठय़ांची मिटिंग बोलावली असल्याने तलाठी अनुपस्थित राहिले असल्याचे कारण सांगितले. 
4संगणकाबाबत विचारले असता, बहुतेक तलाठी भाऊसाहेबांकडे लॅपटॉप असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत इनामगाव येथील कार्यालयात संगणक नसल्याचे निदर्शनास आले. 
 
एक तलाठी, आठ गावांचा कारभारी 
नारायणपूर :  एका बाजूला ऑनलाईन सात-बारा उतारा देण्याची तयारी सुरू असताना तलाठय़ांची संख्याच अपुरी आहे. पुरंदर तालुक्यात एका तलाठय़ाकडे आठ गावांचा कारभार असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. 
4पुरंदरच्या पश्चिम भागात तसेच सासवड परिसरात सासवड, भिवडी, कुंभारवळण हे मंडल आहेत.  भिवडी मंडल मध्ये 14 गावे येतात. तर केतकावळे, देवडी, कुंभोशी, मिसाळवाडी ही गावे एका तलाठय़ाकडे आहेत. या गावांचे तलाठी कार्यालय हे केतकावळे येथे आहे. देवडी येथे यापूर्वी तलाठी कार्यालय होते मात्र चार वषार्पासून ते केतकावळे येथे गेल्याने आता देवडीहून सातबारा व इतर कागदपत्रसाठी केतकावळे येथे जावे लागत आहे. दिवे सामध्ये दिवे, पवारवाडी, काळेवाडी, ङोंडेवाडी, जाधववाडी ही गावे एकाच तलाठय़ाकडे आहेत. बोपगाव सजामध्ये बोपगाव, भिवरी, आस्करवाडी, पठारवाडी याठिकाणी एकाच तलाठी कार्यरत आहे आणि मोठी लोकसंख्या असलेली गावे आहेत. 
4एकाच तलाठय़ाकडे सध्या गराडे, सोमुर्डी, थापेवाडी, वारवडी या गावांची अतिरिकक्त जबाबदारी आहे.  त्यामुळे या तलाठय़ाची मोठी कसरत होत आहे. त्यात आठवडय़ातून चार दिवस भारनियमन होत असल्याने  सातबारे देण्यास अडचणी येत आहे. ज्या व्यक्तींना तात्काळ सातबारा उतारा हवा आहे, अशांना हातानेच तो लिहून दिला जातो.  
4पुरंदर तालुक्यात 7 मंडल आहेत. पहिले सासवड मंडल मध्ये 5 सजा आहेत त्यामध्ये सासवड, आंबोडी, दिवे , पवारवाडी , काळेवाडी, ङोंडेवाडी, जाधववाडी, चांबळी, हिवरे, सोनोरी, वनपुरी , उदाचीवाडी हि 12 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 5 तलाठी कार्यरत आहे.
4दुसरे मंडल हे भिवडी आहे. यामध्ये 5 सजा आहेत. यामध्ये भिवडी, पुरपोखर, कोडीत खु ,कोडीत बु , केतकावळे , देवडी , कुंभोशी , मिसाळवाडी, सुपे खु, पानवडी, गराडे, सोमुर्डी, थापेवाडी, वारवडी, हि 14 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 4 तलाठी कार्यरत आहे.
4तिसरे मंडल हे कुंभारवळण आहे. यामध्ये 6 सजा आहेत. यामध्ये कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, खळद, वाळूंज, पारगाव, सिंगापूर, बेलसर, निळूंज, साकुर्डे, शिवरी, तक्रारवाडी, पिसर्वे, मावडी सुपे हि 15 गावे समाविष्ठ आहेत. त्यासाठी 6 तलाठी कार्यरत आहे.
4चौथे मंडल आहे जेजुरी . यामध्ये 6 सजा आहेत. जेजुरी, धालेवाडी, कोथळे, पिंपरी, रानमळा, नाझरे सुपे, पांडेश्वर, जवळाजरुन, कोळविहरे, मावडी क.प, दौंडज, राख, पिंगोरी हि 13 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 6 तलाठी कार्यरत आहे.
4पाचवे मंडल हे परिंचे आहे. यामध्ये 6 सजा आहेत. यामध्ये परिंचे, हरणी, नवलेवाडी, सटलवाडी , पांगारे, हरगुडे, खेंगरेवाडी, शिंदेवाडी, तोंडल, माहूर, मांढर, दवणोवाडी, धनकवडी, घेरापुरंदर, चीव्हेवाडी ही 15 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 6 तलाठी कार्यरत आहे.
4सहावे मंडल हे राजेवाडी आहे. यामध्ये 6 सजा आहेत. यामध्ये राजेवाडी, गुरोळी, वाघापूर, राजुरी, रीसे, पिसे, माळशिरस, आंबळे, नायगाव हि 9 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 6 तलाठी कार्यरत आहे.
4सातवे मंडल हे वाल्हा आहे. यामध्ये 6 सजा आहेत. यामध्ये वाल्हा, सुकलवाडी , वागदरवाडी , मोरोजीचीवाडी, आडाचीवाडी , अंबाजीचीवाडी, नीरा, पिंपरे खु, थोपटेवाडी, गुळुंचे, कर्नलवाडी, जेऊर,  मांडकी, पिसुर्टी हि 14 गावे समाविष्ठ आहेत. या गावांसाठी 6 तलाठी कार्यरत आहे.
 
सुविधा केंद्राचा नाकर्तेपणा, ऑनलाईन सात-बारा उपलब्ध नाही
इंदापूर  : नागरी सुविधा केंद्राच्या चालकाच्या नाकर्तेपणामुळे सन 2क्1क्-2क्11 पासून इंदापूरात ऑनलाईन सात-बारा दाखले दिले जात नाहीत. नागरी सुविधा केंद्रातून संबंधित दाखल्याची नक्कल काढून दिली जाते. 
सन 2क्1क्-11 च्या दरम्यान तहसील कार्यालयाने गाजावाजा करत ऑनलाईन सातबारा, दाखला देण्याची सोय केली होती. त्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू केलेले कार्यालय अल्पावधीत बंद पडले आहे. 
तहसील कार्यालयाच्या आवारात नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळी ते मंगेश पाटील यांनी चालविण्यासाठी घेतले होते. त्यानंतर त्यांच्याकडून काढून घेऊन टेंडरद्वारे हे काम एका एजन्सीने घेतले. सन 2क्1क्-11 या वर्षात पोटठेकेदारीच्या स्वरूपात वेळापूर (जि. सोलापूर) येथील जाधव नावाच्या इसमाकडे हे नागरी सुविधा केंद्र चालविण्यास दिले गेले. देखरेखीसाठी इंदापूर तालुक्यातील लोकांकडे हे केंद्र दिले आहे. 
दरम्यानच्या काळात गाजावाजा करत तहसील कार्यालयाच्या आवारात ऑनलाईन दाखले देण्यासाठी एक कार्यालय हे उघडण्यात आले. ते 4/5 महिने चालल्यानंतर बंद पडले. ते आजतागायत बंद आहे. त्याची पाटी देखील काढून टाकण्यात आली आहे. 
हे कार्यालय का बंद झाले. नागरी सुविधा केंद्रामधून ऑनलाईन दाखले का दिले जात नाहीत. या विषयी वेगवेगळी मते महसूल खात्यातील अधिकारी कर्मचा:यांकडून व्यक्त होत आहेत. तलाठी वर्गाकडून सांगितले जात आहे की, ऑनलाईन दाखले देण्याची जबाबदारी संबंधित नागरी सुविधा केंद्र चालकाने घेतली होती. मात्र, त्याने निष्काळजीपणा केला. तालुक्याचा संगणक डाटा त्याने व्यवस्थित फीड केला नाही. त्यामुळे दाखले मिळत नाहीत. 
आता इंदापूर तलाठी कार्यालयाकडून रहिवासी व उत्पन्नाचे दाखले दिले जात आहे. नागरी सुविधा केंद्रामधून इतर दाखले नकलेच्या स्वरूपात दिले जात आहे. गेल्या काही महिन्यांर्पयत तोंडे बघून 2 ते 3 हजार रुपयांची चिरीमिरी घेऊन नागरी सुविधा केंद्रातील काही नगांकडून दाखले दिले जात होते. त्या विषयीच्या तक्रारी तहसीलदारांर्पयत गेल्याने जून, जुलै दरम्यान सडके आंबे बाजुला काढण्यात आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कचाटय़ात काही जण सापडल्यामुळे त्याचा धसका घेऊन चिरीमिरी मागणारांची तोंडे बंद झाली आहे. मात्र, थोडक्या प्रमाणात का होईना ‘प्रसाद’ घेतला जात आहे, असे लोकांनी सांगितले.
 
दाखले देण्यास किमान वर्षाचा कालावधी लागेल
सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक गोंधळ असल्या कारणाने चुकीचे दाखले लोकांकडे जाऊ लागले. त्यामुळे ऑनलाईन दाखले देणो बंद करण्यात आले आहेत. सध्या नक्कल काढून ती नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून लोकांना दिली जात आहे. हे चावडीच्या उपक्रमामध्ये ऑनलाईन दाखले देण्याचा विषयक आहे. मात्र, त्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर ऑनलाईन दाखले मिळतील, असे मोहिते यांनी स्पष्ट केले.
-पी. व्ही. मोहिते, नायब तहसीलदार

 

Web Title: Helpatate.!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.