शेतकऱ्याला मुंबईच्या वडापावविक्रेत्याचा मदतीचा हात
By admin | Published: December 4, 2015 06:54 PM2015-12-04T18:54:24+5:302015-12-04T18:58:43+5:30
मुंबई येथिल वडापाव विक्रेता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्यांले आपल्या रोजच्या कमाईतील पैसे साठवून शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत केली आहे.
ऑनलाइल लेकमत
मुंबई. दि. ४ - मुंबईतील वडापाव विक्रेता महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे. त्यांने आपल्या कमाईतील पैसे साठवून शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत केली आहे. ही रक्कम त्याने मुख्यमंत्र्यानां भेटून मुख्यमंत्री निधीत जमा केली आहे. मंगेश अहिवाले असे त्या वडापाव विक्रेत्याचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन मंगेश अहिवालेचं याबद्दल आभार मानले आहेत.
फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ' मानवतेच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे, एका वडापाव विक्रेत्याने मला भेटून २० हजार रुपये मुख्यमंत्री निधीत जमा केले.' ११ ऑक्टोबरला मंगेश अहिवाले यांनी वाडापाव मधून मिळणारी एक दिवसाची सगळी कमाई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचं सांगितले होते. त्यादिवशी १२ रुपये किमतीचा वडापाव त्याने फक्त ५ रुपयास विकला होता.