हेमा मालिनी चित्रपटात जास्त दारु पितात, बच्चू कडूंची सारवासारव
By admin | Published: April 14, 2017 02:58 PM2017-04-14T14:58:05+5:302017-04-14T14:58:05+5:30
हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, त्यामुळे आपण असं वक्तव्य केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 14 - हेमा मालिनी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर अडचणी वाढताना पाहून आमदार बच्चू कडू यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. हेमा मालिनी चित्रपटात दारु पितात, त्यामुळे आपण असं वक्तव्य केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात, या मुद्यावर प्रतिक्रिया देत असताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी "हेमा मालिनी रोज बंपर दारू पितात, पण अजून आत्महत्या नाही केली", असं वादग्रस्त विधान केलं होतं.
‘मी हेमामालिनी यांचे चित्रपट जास्त पाहतो. त्या चित्रपटांमध्ये त्या जास्त दारु पिताना दिसतात. म्हणूनच मी हेमा मालिनी दारु पितात’ असं बोललो होते अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केली आहे. नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर उस्मानाबादेत बच्चू कडूंनी घुमजाव केलं.
नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना लग्नाचा खर्च जास्त झाला म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, दारू पिऊन शेतकरी आत्महत्या करतात, अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या विधानांवर आक्षेप घेत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
"नारायण राणे म्हणाले होते की दारु पिऊन आत्महत्या होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणत होते की लग्नाचा खर्च जास्त झाल्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. वेगवेगळ्या लोकांनी अशी विधानं केलेली ऐकतो. त्यांना माझा असा सवाल आहे की, दारु कोण पित नाही? 75 टक्के आमदार, खासदार, पत्रकारही दारू पितात. हेमामालिनी तर रोज बंपर दारु पितात, मग अजून आत्महत्या केली नाही",असं वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले होते.