पाडयावरील बालकांच्या हाती पाटीएेवजी आला टॅब
By Admin | Published: August 18, 2016 04:41 PM2016-08-18T16:41:59+5:302016-08-18T16:41:59+5:30
पेठ तालुक्यातील उभिधोंड येथील प्राथमिक शाळेतील चिमुकले आता पाटी पेन ऐवजी टॅबचा वापर करून ज्ञानार्जनाचे धडे गिरवतांना दिसून येत
-शिक्षकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाचे पैसे वाचवून दिली शाळेला भेट
नाशिक, दि. 18 - पेठ तालुक्यातील उभिधोंड येथील प्राथमिक शाळेतील चिमुकले आता पाटी पेन ऐवजी टॅबचा वापर करून ज्ञानार्जनाचे धडे गिरवतांना दिसून येत असून या शाळेतील शिक्षकांनी आपल्या घरच्या मुलांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करुन वाचवलेल्या पैशासून विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी केला.
उपधोंड शाळेत चौथीपर्यंत वर्ग असून 54 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेचे शिक्षक अशोक फुंदे व प्रकाश चौधरी यांनी आपल्या मुलांचे वाढदिवस केवळ औक्षण करून साध्या पध्दतीने साजरे केले.यातून वाचवलेल्या पैशातून टॅब खरेदी केला. यामध्ये सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडीओ, अभ्यासक्रम यांचे शिक्षण मुलांना मिळू लागले. मुलांच्या हातात टॅब आल्याने आता ती स्वतःच हाताळू लागली आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी आदिवासी भागातील पालक शिक्षक व लोकप्रतिनिधी सरसावले असून दऱ्याखोऱ्यातही आता तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.