शिराळ्यामध्ये आजपासून नागपंचमीसाठी बेमुदत बंद

By admin | Published: July 1, 2015 11:21 PM2015-07-01T23:21:40+5:302015-07-02T00:22:55+5:30

ग्रामस्थ आक्रमक : उत्सवास परवानगीची मागणी

From here on today, the idle band for Nagpanchami | शिराळ्यामध्ये आजपासून नागपंचमीसाठी बेमुदत बंद

शिराळ्यामध्ये आजपासून नागपंचमीसाठी बेमुदत बंद

Next

शिराळा : शिराळा येथील नागपंचमीसाठी जिवंत नागाच्या पूजेस आणि मिरवणुकीसाठी राज्य शासनाने संसदेतून खास बाब म्हणून परवानगी आणावी, यासाठी राजेंद्र माने यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शिराळा ग्रामपंचायतीने या उपोषणास पाठिंबा देऊन, गुरुवार, दि. २ जुलैपासून बेमुदत बंदचे आवाहन केले आहे.
दि. २९ जूनपासून माने तहसील कार्यालयासमोर नागपंचमीबाबत बेमुदत उपोषणास बसले आहेत. दि. ३० जून रोजी सायंकाळी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन माने यांच्या उपोषणास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार बुधवारी सकाळी अकरा वाजता सर्व ग्रामस्थ, व्यापारी, नाग मंडळाचे सदस्य एकत्र आले. तहसील कार्यालयाजवळ जाऊन त्यांनी माने यांच्या उपोषणास पाठिंबा दिला.
यावेळी माजी सरपंच भीमराव गायकवाड म्हणाले की, नागपंचमी हा शिराळ्याच्यादृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यास हजारो वर्षांची परंपरा आहे. ती पूर्ववत होण्यासाठी कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.
माने यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी दि. २ जुलैरोजी आणखी ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचे सरपंच गजानन सोनटक्के, माजी जि. प. सदस्य महादेव कदम यांनी सांगितले. परंपरा व कायदा याचा समन्वय साधून केंद्र सरकारने खास बाब म्हणून नागपंचमीस नागपूजा व मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणीही केली.
याप्रसंगी उपसरपंच बाबासाहेब कदम, विजयराव नलवडे, संभाजी गायकवाड, उत्तम निकम, संतोष हिरगुडे, अ‍ॅड. प्रदीप जोशी, संदीप पाटील, दस्तगीर आत्तार, माजी सरपंच प्रमोद नाईक, अभिजित नाईक, सुनील कवठेकर, संजय हिरवडेकर, अविनाश खोत, केदार नलवडे, बबलू शेळके, शिवाजी शिंदे, प्रमोद पवार, महादेव कुरणे उपस्थित होते. (वार्ताहर)

शिराळा येथील हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या नागपंचमीबाबत सोशल मीडियावर सर्वत्र मेसेज फिरत आहेत. नागपंचमीबाबत कायद्यात बदल करण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकार यांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: From here on today, the idle band for Nagpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.