अहो, बंडू जिवंत आहे!
By admin | Published: May 14, 2014 05:10 AM2014-05-14T05:10:34+5:302014-05-14T05:10:34+5:30
त्याचे नाव बंडू.. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो.
विठ्ठल कांबळे , घाटंजी (यवतमाळ) - त्याचे नाव बंडू.. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते..आणि दुसर्यादिवशी निरोप येतो,‘ बंडू जिवंत आहे..!’ तो जिवंतपणीच देव झाला.. बंडूला गावी आणण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्याला जिवंत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जिवंतपणी मृत्यू अनुभवण्याचा प्रसंग यवतमाळ जिल्ह्णातील करमना येथील बंडू मांडवकर या तरुणावर आला. घाटंजी तालुक्यातील करमना येथे गुलाब मांडवकर आपल्या परिवारासह राहतात. त्यांना चार मुलं. तिसर्या क्रमांकाचा बंडू नावाचा मुलगा. त्याला दोन अपत्य आहे. तो आठ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्णातील राजुराजवळील रामपूर येथे वास्तव्यास होता. आजूबाजूच्या गावात जावून लोकांचे भविष्य पाहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता. ५ मे रोजी त्याच्या मुलीचे गावात लग्न झाले. अन् ६ मे रोजी सकाळी करमना येथे त्याच्या घरी बंडूचे अपघातात निधन झाल्याचा दूरध्वनी आला. तेव्हा त्याचे वडील, भाऊ, पत्नी व नातेवाईक राजुरा येथे पोहोचले. मृतदेह दाखविण्यात आला. चेहरा ओळखू येत नव्हता पण चेहर्याची ठेवण व शरीरयष्टी यावरून हा आपलाच बंडू आहे, अशी ओळख पटविली. शवविच्छेदनानंतर प्रेत ताब्यात घेतले. अंत्यसंस्कार करण्यात आले. रितीरिवाजाप्रमाणे तिसर्या दिवसाची विधी केला आणि चौथ्या दिवशी देवकारण केले. बंडूच्या नावे चांदीचा देव करण्यात आला. तो देव्हार्यात ठेवण्यात आला. गरिबीतही २५ हजार रुपये या सर्व विधीवर खर्च करण्यात आले.