वाहतूक पोलीस होणार हायटेक

By admin | Published: August 12, 2014 04:07 PM2014-08-12T16:07:49+5:302014-08-12T16:08:30+5:30

भविष्यात वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात प्रिंटर, लॅपटॉप आणि नाइट व्हिजन कॅमेरे संलग्न असलेली बुलेट येऊ शकते.

Hi-Tech traffic police | वाहतूक पोलीस होणार हायटेक

वाहतूक पोलीस होणार हायटेक

Next

 

चाचणी सुरू : प्रिंटर, कॅमेरे जोडलेली बुलेट
मुंबई : भविष्यात वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात प्रिंटर, लॅपटॉप आणि नाइट व्हिजन कॅमेरे संलग्न असलेली बुलेट येऊ शकते. वसईच्या बाइक डिझायनरने खास वाहतूक पोलिसांसाठी तयार केलेल्या या बुलेटची 'ट्रायल' मुंबई पोलीस दलातील अधिकारी घेत आहेत.
पोलीस उपायुक्त (अभियान) संजय बारकुंड यांनी या बुलेटची टेस्ट राइड घेतली. सोबत त्यावर जोडलेली उपकरणे वाहतूक पोलिसांना लाभदायक ठरतील का? याचा आढावा घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहतूक विभागाचे सहआयुक्त बी.के. उपाध्याय, उपायुक्त अतुल पाटील यांनीही या बुलेटची चाचणी घेतलेली आहे. वरिष्ठ अधिकारी आपला अहवाल महासंचालकांना पाठवतील. तेथून तो गृहविभागाकडे जाईल आणि त्यानंतर ही बुलेट घ्यायची की नाही हा निर्णय होईल, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
ही बुलेट ३५0 सीसी असून पुढे व मागे एकूण चार नाइट व्हिजन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाइक जेथे कुठे उभी असेल त्या रस्त्यावरील सर्व घडामोडी रेकॉर्ड होतील. (प्रतिनिधी) लॅपटॉपमध्ये एन्ट्री करून जागच्या जागी दंडाची पावती देता येईल. बुलेटला लाऊडस्पीकर, इन्व्हर्टर, प्रथमोपचार पेटीही जोडलेली आहे.
 

Web Title: Hi-Tech traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.