छुप्या पद्धतीने गडकरींवर वॉच!

By admin | Published: July 28, 2014 04:27 AM2014-07-28T04:27:06+5:302014-07-28T04:27:06+5:30

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणे आढळून आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Hidden methods watch Gadkari! | छुप्या पद्धतीने गडकरींवर वॉच!

छुप्या पद्धतीने गडकरींवर वॉच!

Next

नबीन सिन्हा, नवी दिल्ली
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणे आढळून आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीत तीन मूर्ती लेनवर नितीन गडकरी यांचे
सरकारी निवासस्थान आहे. यातील बेडरूममध्ये ही उपकरणे आढळून आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नवे वादळ घोंगावू लागले आहे.
अमेरिकेतील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (सीआयए) आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) सारख्या परदेशी संस्था अशी उपकरणे बसवू शकतात. अमेरिकेने एनएसएच्या माध्यमातून २०१०मध्ये भाजपा आणि इतर पक्षांची हेरगिरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर या घटनेकडे पाहिले जात आहे. गडकरी यांनी या वृत्ताचा इन्कार केला. माझ्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आवाज ऐकणारे उपकरण आढळून आल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा आहे, ते काल्पनिक आहे, असे गडकरी यांनी टिष्ट्वट केले.

Web Title: Hidden methods watch Gadkari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.