मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा!
By Admin | Published: April 7, 2016 01:56 AM2016-04-07T01:56:30+5:302016-04-07T01:56:30+5:30
अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे
मुंबई : अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महत्वाची धार्मिक स्थळे, व्यापारी केंद्र व गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून नाकाबंदी करण्यात येत आहे.
देशात अतिरेकी हल्ला घडविण्यासाठी काही दहशतवादी शिरले आहेत. त्यांच्याकडून दिल्ली, मुंबईसह महाराष्ट्र व पंजाबमधील महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता आहे, त्याबाबत खबरदारी घ्यावी, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने बुधवारी राज्यांना दिला आहे.
केंद्रात व राज्यात उन्हाळी अधिवेशन सुरु असताना गोंधळ माजविण्यासाठी काही ठिकाणी अतिरेकी हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत एका मोटारीतून काही जण फिरत आहेत. मुंबई व अन्य राज्यातील अन्य महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य घडविले जाण्याची शक्यता आहे, असा संदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने राज्याला पाठविला आहे. (प्रतिनिधी)