रोहित देवांसह सहा वकील होणार हायकोर्टचे न्यायाधीश
By admin | Published: May 28, 2017 04:25 AM2017-05-28T04:25:21+5:302017-05-28T04:25:21+5:30
अॅडव्होकेट जनरल रोहित देव यांच्यासह सहा वकिलांची मुंबई उच्च न्यायालयावर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी निवड झाली असून, त्यांच्या नियुक्तीची
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अॅडव्होकेट जनरल रोहित देव यांच्यासह सहा वकिलांची मुंबई उच्च न्यायालयावर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणुकीसाठी निवड झाली असून, त्यांच्या नियुक्तीची घोषणा या आठवड्यांत अपेक्षित आहे.
देव यांच्याखेरीज वकील भारती डांगरे, मनिष पितळे, संदीप शिंदे, सारंग कोतवाल आणि रियाज छागला न्यायाधीश होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने निवड करून नेमणुकीसाठी शिफारस केल्यावर सहाही जणांना कळविण्यात आले असून, त्यानुसार शपथविधीपूर्वी त्यांना वकिली बंद करावी लागेल. देव न्यायाधीश झाल्यावर, राज्य सरकारला नव्या अॅडव्होकेट जनरलचा शोध घ्यावा लागेल. श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्यानंतर अॅडव्होकेट जनरलचे पद सुमारे नऊ महिने रिकामे राहिल्यानंतर, देव यांची त्या पदावर नियुक्ती झाली.