बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 04:15 PM2017-09-01T16:15:42+5:302017-09-01T16:18:02+5:30

मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता.

High Court notice on death of doctor of Bombay Hospital, Deepak Amrapurkar | बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

Next
ठळक मुद्देमुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता. अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली

मुंबई, दि. 1 - मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडला होता. अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिका आणि अन्य सरकारी यंत्रणांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर हे मॅनहोलमध्ये पडले. त्यामुळे महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आणि अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली आणि त्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. शिवाय अमरापूरकर कुटुंबीयांना वाटत असेल तर ते महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. तशी त्यांना मुभा आहे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
महापालिकेसह मुख्यमंत्री, राज्य सरकार, पोलीस आयुक्त,  पर्जन्यजल निचरा विभाग यांनाही याप्रकरणात प्रतिवादी करण्यात आले होते. आता हायकोर्टात महापालिका आणि अन्य यंत्रणा काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ. दीपक अमरापूरकर यांची ओळख-
डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं.
मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख होते. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत.
पत्नीसोबत शेवटचा झाला होता संपर्क-
डॉक्टर अमरापूरकर दुपारच्या सुमारास रूग्णालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांनी पत्नीला फोन करुन घरी पायी चालत येत असल्याची माहिती दिली. अंधारात अमरापूरकर यांना कमी दिसत असल्याने पत्नीनं त्यांना सांगितले की, तुम्ही आहात तिथेच थांबा, मी तेथे पोहोचते. ज्याठिकाणाहून अमरापूरकर वाहून गेल्याची माहिती मिळाली तेथे आसपास परिसरात त्यांची पत्नी पोहोचलीदेखील होती. मात्र प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले असल्याने पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. त्यावेळी त्यांनी अमरापूरकर यांना फोन केला, मात्र त्यांनी फोनचे उत्तर दिले नाही.  दुसरीकडे प्रत्यक्षदर्शींनी त्यांच्या बहिणीला सांगितले की,  एक व्यक्ती याठिकाणाहून वाहून जात होता,  आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. आमच्या हातात केवळ त्यांची छत्रीच राहिली. आश्चर्याची बाब म्हणून ज्या ठिकाणाहून डॉ अमरापूरकर बेपत्ता झालेत त्या ठिकाणाहून त्यांचे घर केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. घटनास्थळावर अमरापूरकर यांची केवळ छत्री सापडली व त्यांचा शोध आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

 

Web Title: High Court notice on death of doctor of Bombay Hospital, Deepak Amrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.