रमेश कदम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 04:18 AM2017-08-03T04:18:22+5:302017-08-03T04:18:24+5:30
मंजुळा शेट्ये हत्येचा मुद्दा विधिमंडळासमोर उपस्थित करायचा असल्याने एका आठवड्याचा जामीन मंजूर करावा, यासाठी
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येचा मुद्दा विधिमंडळासमोर उपस्थित करायचा असल्याने एका आठवड्याचा जामीन मंजूर करावा, यासाठी आमदार व अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने बुधवारी त्यांचा अर्ज फेटाळला.
‘तुमच्या अधिकाराचा वापर करण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही,’ असे म्हणत, उच्च न्यायालयाने कदम यांचा जामीन अर्ज फेटाळला.
शेट्येच्या हत्येचा साक्षीदार असल्याचा दावा कदम यांनी केला. सहा पोलीस अधिकाºयांनी शेट्येला कशी मारहाण केली, तिचा मृत्यू कसा झाला, याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हाच मुद्दा त्यांना विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात उपस्थित करायचा होता. त्यासाठी त्यांनी जामीन अर्ज केला होता.