पिंगळे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
By admin | Published: February 13, 2017 06:49 PM2017-02-13T18:49:11+5:302017-02-13T18:49:11+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी खासदार यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
Next
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयांकडून पैसे उकळून बेहिशोबी रोकड जमविल्याप्रकरणी अटकेत असलेले सभापती तथा राष्टवादीचे माजी खासदार देवीदास आनंदा पिंगळे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. बाजार समितीच्या कर्मचारी वेतनाच्या गैरव्यहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंगळे यांना दोन महिन्यांपुर्वी अटक केली आहे.
पिंगळे यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२७ कर्मचाऱ्यांच्या फरकाचे सुमारे ६२ लाख ३१ हजार रु पयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. डिसेंबर महिन्याच्या २१ तारखेपासून पिंगळे मध्यवर्ती कारागृहात आहे.