तपासावर उच्च न्यायालय समाधानी

By admin | Published: April 26, 2017 02:27 AM2017-04-26T02:27:59+5:302017-04-26T02:27:59+5:30

सेक्स व ड्रग रॅकेट चालवणाऱ्या शिफु सनकृती पंथाबाबत पोलिसांनी केलेल्या तपासावर मंगळवारी उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

High Court Satisfaction over the investigation | तपासावर उच्च न्यायालय समाधानी

तपासावर उच्च न्यायालय समाधानी

Next

मुंबई : सेक्स व ड्रग रॅकेट चालवणाऱ्या शिफु सनकृती पंथाबाबत पोलिसांनी केलेल्या तपासावर मंगळवारी उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. पोलिसांनी सादर केलेला अहवाल वाचत उच्च न्यायालयाने ही ‘धक्कादायक माहिती’ असल्याचे म्हटले.
सोशल साईट्सद्वारे तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या शिफु सनकृतीविरुद्ध एका सनदी लेखापालाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सनदी लेखापालांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या दोन्ही मुलींना या पंथाच्या लोकांनी ड्रग्स देऊन आपल्या प्रभावाखाली आणले आहे. मुलींना फसवून त्यांच्याद्वारे सेक्स व ड्रग्स रॅकेट चालवण्यात येते. या पंथाचा प्रमुख सुनील कुलकर्णी असून, तो डॉक्टर व मानसोपचारतज्ज्ञ असल्याचा दावा करतो. डिसेंबर २०१६मध्ये याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवून न घेतल्याबद्दल गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले होते. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर पोलिसांनी २० एप्रिल रोजी कुलकर्णीवर गुन्हा नोंदवला व अटक केली. सध्या कुलकर्णी पोलीस कोठडीत आहे.
मंगळवारच्या सुनावणीत गुन्हे अन्वेषण विभागाने न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे सीलबंद अहवाल सादर केला. त्या वेळी ‘आम्ही अहवाल वाचला. तपास सुरू आहे. आम्ही तपासाबाबत समाधानी आहोत. तपासात काही धक्कादायक माहिती आहे, त्यामुळे आणखी तपास करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ जून रोजी ठेवली. दरम्यान, लेखापालांच्या मुलींनीही या खटल्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात अर्ज दाखल करा, मगच अर्ज स्वीकारायचा की नाही, यावर निर्णय घेऊ, असे मुलींना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: High Court Satisfaction over the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.