हायकोर्ट म्हणते खुश्शाल घरात आणून बायका नाचवा !
By admin | Published: March 16, 2016 08:43 PM2016-03-16T20:43:32+5:302016-03-16T20:43:32+5:30
निवासी इमारतीमधील खासगी फ्लॅटमध्ये काही मित्रंनी मद्यपार्टीचे आयोजन करून त्यात डिस्को लाईट व स्पीकर लावून बाहेरून आणलेल्या बायकांना तोकड्या कपड्यात नाचविणे व त्यांच्यावर पैसे उधळणे हा गुन्हा नाही
Next
हायकोर्टाचा निकाल: पोलिसांना नाक खुपसण्याचा अधिकार नाही
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - निवासी इमारतीमधील खासगी फ्लॅटमध्ये काही मित्रंनी मद्यपार्टीचे आयोजन करून त्यात डिस्को लाईट व स्पीकर लावून बाहेरून आणलेल्या बायकांना तोकड्या कपड्यात नाचविणे व त्यांच्यावर पैसे उधळणे हा गुन्हा नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
फ्लॅटचे दरवाजे बंद करून आयोजित केल्या जाणा-या अशा खासगी पार्टीचा शेजा-या-पाजा-यांना जोर्पयत उपद्रव होत नाही किंवा तशी तक्रार कोणी करत नाही तोर्पयत अशा घटना फौजदारी कायद्याच्या कक्षेत येत नाही व पोलीस त्यात नाक खुपसू शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.