‘शेगाव विकास’बाबत शासनाला उच्च न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदतवाढ
By Admin | Published: June 16, 2017 12:48 AM2017-06-16T00:48:42+5:302017-06-16T00:48:42+5:30
देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील विकासकामांना गती देणारे आदेश नागपूर खंडपीठाने एप्रिलमध्ये दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील विकासकामांना गती देणारे आदेश नागपूर खंडपीठाने एप्रिलमध्ये दिले होते.
त्या आदेशांवरील अंमलबजावणीसंदर्भात उत्तर
सादर करण्यासाठी राज्य शासनाने मागितलेला दोन आठवड्यांचा
अवधी गुरुवारी न्यायालयाने
दिला. संत गजानन महाराज मंदिराच्या पश्चिमेकडील मातंगपुऱ्याची जमीन संस्थानला पार्किंग प्लाझा बांधण्यासाठी देण्याचा निर्णय
झाला आहे.
ही जमीन शासनाची असून त्यावर लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडामार्फत अन्य ठिकाणी घरे बांधली आहेत. त्यासाठी
संस्थानने ५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
मातंगपुऱ्यातील नागरिकांनी नवीन घरांचा ताबा घेतला आहे.
परंतु, त्यांनी जुनी घरे सोडली
नाहीत. ते दोन्ही ठिकाणी वास्तव्य करीत आहेत.
न्यायालयाने या नागरिकांना सात दिवसांत घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्याचे व या कालावधीत
त्यांनी घरे रिकामी न केल्यास
घरे बळपूर्वक तोडण्याचे निर्देश
दिले होते.